शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! ...म्हणून 8 वर्षांच्या चिमुकल्यावर आली रिक्षा चालवण्याची वेळ; डोळे पाणावणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:17 IST

Eight year old boy of blind Andhra couple drives auto : गोपाळ कृष्ण असं या आठ वर्षांच्या मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीमध्ये शिकतो.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मात्र आता अशातच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या चिमुकल्यावर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांचं पोट भरण्यासाठी हैद्राबादमधील अवघ्या आठ वर्षांचा मुलगा ई-रिक्षा चालवत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शाळेचा ड्रेस परिधान करून या चिमुकल्याला ई-रिक्षा चालवताना पाहिलं. तो दोन जणांना घेऊन जात होता. हे पाहताच त्या व्यक्तीला थोडा धक्का बसला. त्या व्यक्तीने रिक्षा थांबवली आणि याबाबत विचारणा केली. तेव्हा चिमुकल्याने आपल्यावर आलेल्या परिस्थितीची माहिती दिली. 

गोपाळ कृष्ण असं या आठ वर्षांच्या मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. कुटुंबाला जगवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण कऱण्यासाठी हैद्राबादमध्ये ई-रिक्षा चालवत असल्याची माहिती मुलाने दिली आहे. या चिमुकल्याचे आई-वडील दोघेही दिव्यांग आहेत. आणि त्याला भाऊ-बहीण देखील आहेत. या सर्वांच्यात गोपाळ मोठा आहे. त्यामुळे घरच्या सर्वांची जबाबदारी ही त्याच्यावर आहे. गोपाळ कृष्णने अभ्यास करुन झाला की मी माझ्या आई-बाबांना ई-रिक्षामधून घेऊन जातो असं सांगितलं आहे. 

मोठा मुलगा या नात्याने माझ्या कुटुंबाची मदत करणं ही माझी जबाबदारी असल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. गोपाळ कृष्णचे दिव्यांग आई-वडील हे चंद्रगिरी शहरात वेगवेगळ्या भागात भाजीपाला आणि किराणा माल विकतात. गोपाळच्या वडिलांनी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही दृष्टिहीन आहोत. आम्हाला तीन मुलं आहेत आणि मोठा मुलगा त्याचा अभ्यास संपवून आम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतो असं म्हटलं आहे. या दोघांची ही तिन्ही मुलं शारिरीकदृष्ट्या सुदृढ आहेत आणि हे दाम्पत्य आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घेत आहे. 

केवळ आठ वर्षांचा चिमुकला चालवतोय रिक्षा

गोपाळच्या वडिलांनी आम्हाला असं वाटतं की सरकारने आमची पेन्शन वाढवायला हवी. सध्या आम्हाला पेन्शन म्हणून फक्त तीन हजार रुपये मिळतात, आणखी मदत करा असं म्हटलं आहे. गोपाळ कृष्ण आपल्या आईबाबांना चंद्रगिरी शहरात सोडतो जिथे ते आपल्याकडच्या वस्तू विकतात. काही दिवसांपूर्वीच त्याला पोलिसांनी पकडलंही होतं आणि तो हे वाहन पुन्हा चालवणार नाही असं आश्वासन घेऊन त्याला सोडलं असल्याचं म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाIndiaभारत