मुंबई : मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातून बुधवारी एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील पाच उमेदवारी अर्ज हे अपक्षांचे असून, उर्वरित तीन अर्ज भारतीय शेतकरी कामगार पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवारांनी दाखल केले आहेत.भांडुप येथून इंद्रजीत सिंग चड्डा, चारकोप येथून शेख फत्ते मोहम्मद, विलेपार्ले येथून राकेश अरोरा, घाटकोपर पूर्व येथून सुनील मोहिते आणि वांद्रे पश्चिम येथून शरी गुलफाम अन्वरखान यांनी अपक्ष म्हणून तर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अकबर हुसेन शफी हुसेन यांनी अणुशक्ती नगर येथून अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)
उपनगरातून आठ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: September 25, 2014 01:42 IST