शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणामध्ये आठ नक्षली ठार; नव्यानेच स्थापन संघटनेचा नि:पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:01 IST

तेलंगणात गुरुवारी सकाळी बेथापुडी गावानजीक चकमकीत ‘सी पी बाटा’ या सशस्त्र नक्षलवादी संघटनेचा विभागीय समिती सचिव व कमांडरसह ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करून तेलंगणाच्या विशेष पोलीस दलाने या संघटनेला हात-पाय पसरण्याआधीच जबर तडाखा दिला.

हैदराबाद : तेलंगणात गुरुवारी सकाळी बेथापुडी गावानजीक चकमकीत ‘सी पी बाटा’ या सशस्त्र नक्षलवादी संघटनेचा विभागीय समिती सचिव व कमांडरसह ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करून तेलंगणाच्या विशेष पोलीस दलाने या संघटनेला हात-पाय पसरण्याआधीच जबर तडाखा दिला.कोळसा खाण परिसरातील कोठागुडेमजवळच्याच जंगलात पोलीस व नक्षलींमध्ये तुंबळ चकमक उडाली. नक्षलींचा खात्मा केल्यानंतर पोलिसांनी शस्त्रे व स्फोटकांसह सामान-सुमान असलेली आठ गठोडी जप्त केली आहेत. एक एसएलआर, दोन ८ मिमीच्या बंदुका आणि दोन एसबीबीएल बंदुकांचा जप्त करण्यात आलेल्या साहित्यात समावेश आहे.सी पी बाटा या संघटनेची मूळ तात्त्विक बांधिकली चंद्र पुल्ला रेड्डी गटाशी आहे. पीपल्स वॉर ग्रुपच्या तुलनेत प्रभावी असलेल्या चंद्र पुल्ला रेड्डी या गटाची स्थापना सीपीआय-एमएल जनशक्तीच्या सदस्यांनी केली होती.वीटभट्टी, फरशी उद्योग, दारू दुकानदार, इमारती लाकडाचे व्यापारी, सरकारी ठेकेदार आणि बाजार समितीतील दलालांंना धमकावून खंडणी वसुली करण्यात ही संघटना सक्रिय आहे. बेथापुडीगतच्या जंगलात या संघटनेने काही तरुणांना पाचारण केल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांच्या दलाच्या नक्षलवादीविरोधी पथकाने त्यांना पकडण्यासाठी बुधवारी रात्रीच बेथापुडी गावाकडे कूच केले. कोणालाही पळ काढता येऊ नये, याची खबरदारी घेत पोलिसांनी या भागाला चोहोबाजूने वेढा घातला.नऊ फुटीर गट सक्रियकोठगुडेम भागात नक्षलवाद्यांचे वेगवेगळे नऊ फुटीर गट सक्रिय होते. हे नक्षलवादी आधी जनशक्ती संघटनेचे सदस्य होते. सीपीआय-एमएल चंद्र पुल्ला रेड्डी (सीपी) बाटा या नावाची नवीन संघटना २४ जुलै रोजी स्थापन करण्यात आली होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी