शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या निषेधार्थ काळी पट्टी बांधून ईदचे नमाज पठण

By admin | Updated: June 27, 2017 00:35 IST

हरयाणातील १७ वर्षीय जुनैदच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच्या खंडवली गावातील लोकांनी सोमवारी दंडाला काळी पट्टी बांधून रमजान ईदचे विशेष नमाज पठण केले.

वल्लभगढ : हरयाणातील १७ वर्षीय जुनैदच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच्या खंडवली गावातील लोकांनी सोमवारी दंडाला काळी पट्टी बांधून रमजान ईदचे विशेष नमाज पठण केले. जुनैदच्या गावातील लोकांनी हत्येचे सत्र कधी संपुष्टात येणार आहे, असा सवाल यावेळी केला. खंडवली गाव दिल्लीजवळ आहे. तेथील रहिवासी शकील म्हणाले की, जुनैदच्या हत्येनंतर आम्ही ईदचा आनंद साजरा करू शकत नाही. त्यामुळे दंडाला काळी पट्टी बांधून याचा निषेध करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेजारच्या गावातील मुस्लिमांनीही सकाळच्या नमाज पठणादरम्यान काळी पट्टी बांधली होती. दिल्लीतील सदर बाजार येथून २२ जून रोजी आपल्या दोन भावांसह सणाची खरेदी करून जुनैद रेल्वेने घरी परतत होता. तेव्हा डब्यातील एका गटाने जुनैद आणि त्याच्या भावावर तुम्ही बीफ खाणारे आहोत, असे म्हणून त्यांना मारहाण केली. यात जुनैदचा मृत्यू झाला. पोलिसांनी जागेच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले. तथापि, जुनैदचा भाऊ हाशिमने जागेच्या वादावरून भांडण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे फेटाळून लावले. त्या दिवशीचा प्रसंग सांगताना त्याला अनेक वेळा रडू कोसळले. या घटनेला चार दिवस उलटल्यानंतर केवळ एक आरोपी पकडला गेला आहे. काश्मीरमध्ये दगडफेक : काश्मीर खोऱ्यात ईद-उल-फित्र सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईदच्या विशेष नमाजसाठी लोक मशिदी, इदगाह येथे गोळा झाले होते. तथापि, काही ठिकाणी सुरक्षा दले आणि निदर्शकांत दगडफेक आणि चकमकीच्या घटनाही घडल्या. १या चकमकीत २0 नागरिक आणि पाच पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हजरतबल मशिदीत सर्वाधिक संख्येने लोक आले होते. येथे ५० हजारांहून अधिक लोकांनी नमाज अदा केली. सोपोर, अनंतनाग, राजपुरा, शोपियाँ आदी भागांत निदर्शक आणि सुरक्षा दलांत चकमकी झाल्या. तथापि, यात कोणीही जखमी झाले नाही.