शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद येथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
पत्रकाचा आशय असा- पाणीप्रश्न युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शेळगाव बॅरेज पाणी आणून शुद्धीकरणाची योजनेचे काम राजकीय द्वेषातून बंद होते; मात्र त्याबाबत पाठपुरावा करून गती देण्यास आम्हीच प्रयत्न केले असून जलशुद्धीकरणाच्या जलवाहिन्यांचे काम ७० टक्के झाले असून जॅकवेलचे काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणत आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी योजनेच्या कामाची गती मंदावण्यासाठी संभाव्य अडचणी व धोका काय होईल हे जाहीर न करता व कुठलेही मार्गदर्शन न घेता जलवाहिन्यांच्या मार्गात बदल करण्याची मागणी होत असल्याचा आक्षेप रोटे यांनी घेतला आहे. परिणामी कामास विलंब होईल, मार्च अखेरपर्यंत योजनेचा निधी खर्च न झाल्यास योजनेचा निधी परत जाऊन काम रखडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गावातील जलवाहिन्यांची गळती, दुरुसती, तोट्या बसविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य दिले असून एमआयडीसीच्या ४ कोटी ९५ लाख ८३५ रुपयांची थकबाकीमुळे एमआयडीसीचे पाणी मिळण्यास अडचणी येत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्त्रोताच्या जवळील ५०० मीटर अंतरावरील विहिरी व इतर पाणीसाठे यांचेतील पाणी वापरावर निर्बंध आणून अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोटे यांनी पत्रकात म्हटले आहे. १ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणी वाचवा अभियान गाव पातळीवर राबविणार आहे. पाणी वापराबाबत जनजागृती करण्यासोबत विविध बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)