शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: July 6, 2016 00:43 IST

जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

मानधनावर नियुक्ती करा : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ, पंचभाई यांनी दिला आंदोलनाचा इशाराभंडारा : जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असल्या तरी यात मात्र काही शाळा शिक्षकाविना असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामध्ये जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांचे मध्ये सुसुत्रतेचा अभाव कोणताही मागचा पुढचा विचार न केल्याने पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या बदल्या केल्यामुळे काही शिक्षक बदलीच्या ठिकाणी रूजू झाले तर काही शिक्षकाकडून आपल्या मुळच्याच ठिकाणावर आहेत. काही बदली होवूनही आदेश मिळूनही नवीन ठिकाणी रूजू झाले नाहीत. यात महिला शिक्षकांची फार मोठी समस्या आहे. मुख्य रस्त्यावर असलेले गाव आपल्याला मिळावे यासाठी लाखोंचा घोडाबाजार झाल्याची चर्चा आहे. तशी खुद्द चर्चा शिक्षकांमध्ये आहे.शिक्षकांच्या बदल्या विरोधात शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या. ज्यांना सोयीचे ठिकाण मिळाले ते तत्काळ रूजू झाले. जे बाजाराचे मुल्य देवूनही योग्य ठिकाण न मिळाल्यामुळे जागेवर स्थिर आहेत. या घोळात काही शाळांत अधिक तर काही शाळात एकही नाही. महलिा शिक्षकांना बऱ्याच लांबून ये-जा करावा लागत असल्याने वर्षभरात येण्या-जाण्याचा खर्चाचा हिशोब करून लाखो रूपये मोजायला तयार शिक्षक तयार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अगोदरच विद्यार्थी संख्या कमी असल्याने बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही शाळा अखेरची घटका मोजत आहेत. या बदल्यासंदर्भात केव्हा विचार करतील व चिमुकल्या मुलांना केव्हा शिक्षक मिळतील?, शिक्षक मिळणार की नाही हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना शिक्षक मिळाले नाही तरी गरीबांच्या मुलांची खासगी शाळेत शिकण्याची ऐपत नसल्याने ‘शिकवा की नका शिकवू आम्ही जिल्हा परिषद शाळेतच जाणार’ असे बोलके चित्र पवनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. पवनी तालुक्यातील निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे तुनतुने वाजवणारे पुढारी शाळेसाठी आवाज का काढत नाही, असा प्रश्न जनता करीत आहे.सदर प्रकरणा संदर्भात पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला भेट देवून शहानिशा केली. यात बरीच पदे रिक्त असल्याचे लक्षात आले. यामध्ये केंद्र प्रमुखाची दोन पदे, शिक्षक विस्तार अधिकारी दोन पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पाच पदे, पदवीधर शिक्षक, विस्तार अधिकारी दोन पदे, पदवीधर शिक्षक १५, सहायक शिक्षक १४, वरिष्ठ सहायक एक व परिचर एक अशी पदे रिक्त आहेत. यावर तोडगा काढावा, अशी मागणी तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)