शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

चिमुकल्यांचे जीव मुठीत धरुन शिक्षण

By admin | Updated: November 4, 2015 00:23 IST

निटूर : निलंगा तालुक्यातील अंगणवाड्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, दोनशेहून अधिक अंगणवाड्यांची पडक्या खिंडारासारखी अवस्था झाली असल्याने चिमुकल्यांना मात्र तशाच ठिकाणी आपला जिव मुठीत धरुन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे़

निटूर : निलंगा तालुक्यातील अंगणवाड्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, दोनशेहून अधिक अंगणवाड्यांची पडक्या खिंडारासारखी अवस्था झाली असल्याने चिमुकल्यांना मात्र तशाच ठिकाणी आपला जिव मुठीत धरुन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे़ निलंगा तालुक्यामध्ये एकूण ३१० अंगणवाड्या असून, त्यात २० हजारहून अधिक बालके शिक्षण घेतात़ तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच अंगणवाड्यांचे बांधकाम १९९३ च्या भूकंपानंतर झाले आहे़ विशेष म्हणजे १९९३ मध्ये बांधकाम झाल्यापासून आजपर्यंत एकदाही अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला नाही़ येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील संपूर्ण अंगणवाड्यांचा सर्वे करण्यात आला आहे़ तालुक्यातील ३१० अंगणवाड्या पैकी २०० अधिक अंगणवाड्यांची मोठी दुररावस्था झाल्याचे आढळून आले आहे़ यात अंगणवाड्यामध्ये फरशी नसणे, पायर्‍या नसणे, अंगणवाडीवरील स्लॅपला गळती लागली असल्याचे प्रकार रर्सास दिसुन येत आहे़अंगणवाडी समोरील गेटची दुरुस्ती नाही़ कम्पाऊंड नाही, शौचालयास दरवाजे नाहीत़ भिंतीला मोठ मोठे तडे जाऊन भिंती दुभंगल्या आहेत़ अंगणवाडीस दरवाजे नाहीत, शौचालयाचे खड्डे नाहीत, किचन क˜े खराब होऊन पडले आहेत़ खिडक्या नाहीत, ज्या अंगणवाड्या पत्र्यांच्या आहेत़ त्या अंगणवाडीवरील पत्र्यांना छिद्र पडून पत्रे गळत आहेत़ तर काही अंगणवाड्यावरील पत्रेच वार्‍याने उडून गेले आहेत़ तसेच स्लॅपच्या छताच्या धलप्या पडून छत कोसळण्याच्या मार्गावर आहेत़ १९९३ ला या अंगणवाड्याचे बांधकाम झाल्यापासून एकाही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने अंगणवाड्यांची मोठी दुरावस्था होऊन त्यांना पडक्या खिंडाराचे स्वरुप आले आहे़ त्यामुळे लहाण चिमुकल्यांना अशाच ठिकाणी आपला जिव मुठीत धरुन शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे या अंगणवाड्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे़ या बाबत बालविकास प्रकल्प अधिकारी एम़एम़ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही तालुक्यातील दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांची माहिती घेऊन त्या अंगणवाडीला दुरुस्त करण्यासाठी किती निधी लागणार आहे, हे अंगणवाडी निहाय आकडेवारीनुसार माहिती काढली असून, तालुक्यातील सर्व अंगणवाड्या दुरुस्तीसाठी ४३़४५००० लक्ष एवढा निधी लागणार आहे या लागणार्‍या निधीची मागणी आम्ही महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषदेकडे पाठविला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़