शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

...तर यंदाची दिवाळी 'महागडी' ठरणार; सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 07:36 IST

आयात घसरल्याने तुटवडा; साठेबाजी होत असल्याचीही शंका : सर्वसामान्यांना फटका

- नामदेव मोरे नवी मुंबई : भाजीपाला व डाळींप्रमाणे खाद्यतेलांच्या किमतीही भडकल्या आहेत. तेलांच्या किमतीमध्ये जवळपास २५ टक्के वाढ झाली आहे. आयात घसरल्यामुळे देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. तेलाची साठेबाजी सुरू असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. ठोस उपाययोजना न केल्यास दसरा व दिवाळीतही दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.देशातील तेलाचे उत्पादन व मागणी यामध्ये तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी सोयाबीन व सूर्यफुल तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. जवळपास १५० लाख टन तेलाची प्रत्येक वर्षी आयात केली जाते. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्याचा परिणाम तेलाच्या आयातीवरही झाला. यामुळे देशभर तेलाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. भारतात अमेरिका, अर्जेंटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात तेल आयात होत असते. परंतु या वर्षी तेथेही समाधानकारक उत्पादन होणार नसल्याची शक्यता असल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या दरवाढीवर झाला आहे.गेल्या महिन्यात सूर्यफुल ९० रुपये किलो दराने विकले जात होते. तेच दर आता १३० रुपयांवर गेले आहेत. सोयाबीन तेल ८५ ते ९० वरून १२० रुपयांवर, शेंगतेल १२० रुपयांवरून १४० ते १६० रुपयांवर व पामतेल ९० ते ९५ रुपयांवरून ११० रुपयांवर पोहोचले आहे. दसरा व दिवाळीमध्ये तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मार्केटमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही, तर दर अजून भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.साठेबाजांवर कारवाईची गरजहॉटेल्स सुरू झाल्यामुळे तेलाची मागणी वाढली आहे. दसरा व दिवाळीमध्ये मागणी दुप्पट होणार असल्यामुळे तेलाची साठेबाजी सुरू झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढून मोहरीच्या तेलाला मागणी प्रचंड वाढली असून, मोहरीचीही मोठ्या प्रमाणात साठेबाजी झाली असून साठेबाजांवर कारवाईची मागणी होत आहे.कोरोनामुळे तेलाची पुरेशी आयात होऊ शकली नसल्यामुळे देशात तुटवडा निर्माण होऊन भाववाढ झाली आहे. अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझीलमध्ये या वर्षी समाधानकारक पीक नसल्याने त्याचा परिणामही दरांवर होत असून पुढील काही दिवस तेजी कायम राहील.- श्रीकांत कुवळेकर, कृषी पणन व वायदेबाजार तज्ज्ञकिरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो तेलाचे दरप्रकार         सप्टेंबर       ऑक्टोबरसूर्यफूल    90-100      120-130सोयाबीन   85-90        110-120पामतेल     80-85        90-110शेंगतेल    110-120     140-150