शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 05:39 IST

दिल्लीतील मद्य धोरणाशी निगडित मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामिनासाठी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला ईडीने विरोध केला. त्यांचा गंभीर आर्थिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध करणारे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. दिल्लीतील मद्य धोरणाशी निगडित मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. 

विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांना ईडीने सांगितले की, आमच्याकडे केजरीवाल यांच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामिनासाठी केलेल्या अर्जाबाबतची पुढील सुनावणी १४ जूनला होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काही दिवस अंतरिम जामीन मिळाला होता. पण, त्यांची गेल्या रविवारी पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीला केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 

अंतरिम जामिनाची मुदत वैद्यकीय कारणांपायी वाढवावी अशी अरविंद केजरीवाल यांनी केलेली विनंती दिल्लीच्या न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत न्यायालयाने वाढ केली होती. मद्य धोरण प्रकरणात त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळावा यासाठी अरविंद केजरीवाल सुप्रीम कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना सशर्त जामीन दिला होता. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तिहार तुरुंगात परतले होते. 

केजरीवालांना जामीन मिळतो, मग मला का नाही? : इम्रान खानभारतात लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला असे उदाहरण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वतीने न्यायालयात देण्यात आले. आपल्याला कारागृहामध्ये नीट वागणूक दिली जात नाही अशी तक्रारही इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तेथील सरन्यायाधीश काझी फैज इसा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्या हातातील सत्ता गेली व त्यानंतर मला सतत लक्ष्य करण्यात येत आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालय