शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर प्रकरणी त्यागींना ईडीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:08 IST

आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांना समन्स बजावले आहे.

नवी दिल्ली : आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांना समन्स बजावले आहे. ईडी या व्यवहारात ३,६०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराची चौकशी करीत आहे. केंद्रीय यंत्रणेने हवाई दलाच्या माजी प्रमुखाला बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांना हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) बजावण्यात आले आहे. त्यागी यांनी ईडीसमोर कोणत्या तारखेला हजर राहायचे आहे हे सांगण्यात आले नसले तरी त्यांना व्यक्तिश: पुढील आठवड्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यागी यांची यापूर्वी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) याच प्रकरणात चौकशी केली होती व तीत त्यागी यांनी मी काहीही चुकीचे केलेले नाही, असा दावा केला होता. आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात मिलान (इटली) येथील न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यागी यांची चौकशी आवश्यक बनली आहे. भारताला अति अति महत्वाच्या व्यक्तिंसाठीच्या १२ हेलिकॉप्टर विक्री व्यवहारात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून इटलीची संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रातील मोठी कंपनी फिनमेकॅनिकाचे माजी प्रमुख गियुसेप ओर्सी आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांना शिक्षा सुनावली आहे. हेलिकॉप्टरच्या खरेदी व्यवहारात आॅगस्टा वेस्टलँडला निविदा भरता याव्यात म्हणून त्यागी यांनी या हेलिकॉप्टरची उंची कमी केली असा त्यांच्यावर आरोप आहे. ते ३१ डिसेंबर २००५ रोजी हवाई दलाचे प्रमुख झाले व २००७ मध्ये सेवानिवृत्त झाले.

टॅग्स :Agusta Westland Scamऑगस्टा वेस्टलँड घोटाळा