शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

फोर्टिसचे माजी प्रवर्तक मालविंदरसिंगसह दोघा जणांना ईडीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 5:37 AM

मालविंदरसिंग व रेलिगेअर एंटरप्राईजेस लिमिटेडचे (आरइएल) माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गोधवानी यांना मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीने गुरुवारी अटक केली.

नवी दिल्ली : फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक मालविंदरसिंग व रेलिगेअर एंटरप्राईजेस लिमिटेडचे (आरइएल) माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गोधवानी यांना मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीने गुरुवारी अटक केली. या दोघांनी रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडमध्ये (आरएफएल) अफरातफर केल्याचा आरोप आहे.या घोटाळ््याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मालविंदरसिंग व सुनील गोधवानी यांना तिहार मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिथेच ईडीने या दोघांना अटक केली. या घडामोडींची माहिती ईडीचे वकील नितेश राणा यांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणात मालविंदरसिंग यांचा भाऊ शिविंदर व अन्य दोघे आरोपी कवी अरोरा, अनिल सक्सेना यांनाही तिहार तुरुंगात ठेवले आहे. आरएफएल ही आरइएल समुहाची कंपनी आहे. मालविंदरसिंग व शिविंदरसिंग हे आरएफएल कंपनीचे माजी प्रवर्तक आहेत. हे दोघे व अन्य आरोपींनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.