शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बिहारात रालोआला बंडखोरीचे ग्रहण

By admin | Updated: September 17, 2015 01:11 IST

रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे (लोजपा) खासदार रामकिशोरसिंग यांनी बुधवारी पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असतानाच तिकीट

पाटणा : रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे (लोजपा) खासदार रामकिशोरसिंग यांनी बुधवारी पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असतानाच तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये रालोआला जबर हादरा बसला आहे.वैशाली लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामकिशोरसिंग यांनी लोजपाच्या सरचिटणीस आणि संसदीय पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी राजस्थानमधील प्रभारी सरचिटणीसपदाचा पदभारही सोडला. ते दीर्घकाळापासून पासवानांचे निकटस्थ राहिले आहेत. रालोआसोबत जागावाटप करताना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने ते नाराज होते. रामकिशोरसिंग यांची नाराजी दूर केली जाईल, असे संसदीय पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी अलीकडेच म्हटले होते; मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यामुळे त्यांनी सर्व पदाचा राजीनामा देण्याचे पाऊल उचलले. रामकिशोरसिंग यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंग यांचा धक्कादायक पराभव केला होता. (वृत्तसंस्था) भाजपच्या दोन आमदारांचा बंडाचा झेंडा- तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले भाजपचे दोन आमदार अमनकुमार आणि अजय मंडल यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. मला तिकीट नाकारण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांनीही आश्चर्य व्यक्त केल्याचे भागलपूर जिल्ह्यातील पीरपैनती (राखीव) मतदारसंघाचे आमदार अमनकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. अजय मंडल हे त्याच जिल्ह्यातील नाथनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.