शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

...तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार; निवडणूक चिन्ह गोठवले जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:52 IST

पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडीअभावी अपात्रतेचे सावट

नवी दिल्ली : कायमस्वरूपी अध्यक्ष नियुक्त न करता येणे, काँग्रेसच्या अस्तित्वासाठी धोकायदाक ठरू शकते. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी अध्यक्षपदाचा राजनीमा दिल्यानंतरही आतापर्यंत काँग्रेसने कायमस्वरूपी अध्यक्ष का नियुक्त केला नाही? काँग्रेसला याबाबत निवडणूक आयोगाला समाधानकारक खुलासा करता आला नाही, तर काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठविले जाऊ शकते. अपात्र किंवा निलंबन कारवाईला काँग्रेसला सामोरे जावे जाऊ शकते.२०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळास सोमवारी एक वर्षे पूर्ण होत आहे. कोविड-१९ च्या साथीमुळे नवीन अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, असे स्पष्ट करीत काँग्रेसने स्थिती सर्वसामान्य होताच निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन करण्याचे आश्वासनही दिले आहे. काही वरिष्ठ नेत्यांचे असे म्हणणे आहे की, संघटनात्मक निवडणुकीतून नवीन अध्यक्षांची निवड केली जावी. तोवर ठराविक अवधीसाठी कमलनाथ किंवा भूपिंदरसिंह हुड्डा यांच्यासारख्या नेत्याला पक्षप्रमुख केले जाऊ शकते.  निवडणुकीत सहभागी होऊन युवा नेत्यांना आपल्या क्षमतेचा अंदाज घेता येईल.अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप नाही; पण...निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या अंतर्गत मुद्यांत हस्तेक्षप करीत नाही. तथापि, राजकीय पक्षांनी नियमांचे पालन न केल्यास निवडणूक आयोग संबंधित पक्षाविरुद्ध कारवाई करू शकते.निवडणूक प्राप्त अधिकारातहत निवडणूक चिन्ह गोठवू शकते. १९८९ मधील लोकप्रतिनिधी अधिनियम कलम २९ (ए), पोटकलम (५) तहत राजकीय पक्षांचे कार्य चालते.काँग्रेस संघटनेत पद रिक्त झाल्यानंतर ठराविक अवधीत नवीन अध्यक्षांची निवड करण्यासंबंधी विशेष तरतूद आहे का? याबाबत निवडणूक आयोग चौकशी करू शकते. तसेच या ठराविक मुदतीच्या आत पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचाही आदेश आयोग देऊ शकते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी