शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या यशाचे गमक आधीच्या संघकार्यात

By admin | Updated: July 13, 2017 04:45 IST

देशाचे पंतप्रधान म्हणून जगाला दिसणारा उज्ज्वल प्रवास त्यांनी पूर्वी संघ स्वयंसेवक म्हणून केलेल्या ‘अप्रसिद्ध’ कामांमुळेच शक्य झाला आ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचा आधी गुजरातचे मुख्यमंत्री व आता देशाचे पंतप्रधान म्हणून जगाला दिसणारा उज्ज्वल प्रवास त्यांनी पूर्वी संघ स्वयंसेवक म्हणून केलेल्या ‘अप्रसिद्ध’ कामांमुळेच शक्य झाला आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी येथे सांगितले.‘सुलभ इंटरनॅशनल’चे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी मोदींवर लिहिलेल्या ‘‘मेकिंग आॅफ ए लेजंड’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर भागवत म्हणाले की, मोदी संघाचे स्वयंसेवक म्हणूनच काम करत राहिले असते तर संघ परिवाराबाहेरच्या फार थोड्यांनाच त्यांची खरी ओळख होऊ शकली असती. पण संघाने मात्र तरीही त्यांचे महत्त्व ओळखलेच असते.गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी मोदी एक संघ स्वयंसेवक म्हणून जसे होते तसेच आजही आहेत आणि जगभर मिळत असलेल्या प्रसिद्धी व प्रशंसेने त्यांच्या व्यक्तिमत्वात व नेतृत्वगुणांत काहीही फरक पडलेला नाही, असे सांगून ते म्हणाले की, मोदींमध्ये कष्ट करण्याची तयारी, धाडस, संयम, बुद्धिमत्ता, कणखरपणा आणि निर्धार असे अनेक गुण आहेत. काहीही करणे अशक्य आहे असे मानत नाहीत व ते शक्य करण्यासाठी आवश्यक तो खंबीरपणा दाखवतात.भागवत म्हणाले की, लोकांचे लक्ष मोदींच्या व्यक्तिमत्वावर केंद्रित होणे स्वाभाविक आहे. त्यांंच्यासारख्या यशस्वी व्यक्तीने त्यासाठी केलेल्या परिश्रमाचीही लोकांनी नोंद घ्यायला हवी. यादृष्टीने हे पुस्तक उपयुक्त आहे. त्यातून मोदी जसे भासतात, तसेच वास्तवातही आहेत, हे जगाला समजेल. स्वातंत्र्यानंतर आजवर काय करायला हवे याविषयीच बोलले गेले. पण आता त्या गोष्टी प्रत्यक्षात होऊ लागल्या आहेत. कारण आता प्रत्यक्ष काम केले जात आहे. दोन हजार वर्षांपूर्वी जगात भारताला जी प्रतिष्ठा होती ती पुन्हा प्राप्त करून त्याहूनही पुढे जाण्याचे काम करावे लागणार आहे. हे काम खूप मोठे आहे व एकटे सरकार त्यासाठी पुरे पडणार नसल्याने प्रत्येक नागरिकाने त्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जगभर निषेध होत असताना भागवत त्यावर काय बोलतात, याचे औत्सुक्य होते. पण त्यांनी भाषणात त्याचा उल्लेखही केला नाही.भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी प्रामुख्याने मोदी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकास योजनांचा उल्लेख केला व या सर्वांचा परिणाम म्हणून सन २०२४पर्यंत भारताचे चित्र आमूलाग्र बदललेले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.>मोदी उत्तम ठेकेदार!सरसंघचालक म्हणाले की, लोकांना आपल्या कल्याणासाठी मोदींच्या रूपाने कर्तबगार ठेकेदार मिळाला आहे. पण सर्व त्यांच्यावर सोपवून लोक स्वत: झोपून राहतील, असा धोका आहे. तसे होता कामा नये. लोकांनी मोदींवरील पुस्तके वाचून त्यांचे गुण अंगी बाणवायला हवेत.धर्माच्या नेतृत्वानेच कल्याणवृंदावन येथील एका संतपुरषाशी झालेल्या चर्चेचा हवाला देऊन भागवत म्हणाले की, जेव्हा धर्म नेतृत्व करेल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल. धर्म याचा अर्थ सत्य, करुणा व आंतर्बाह्य शुचिता. हे साध्य करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. समाजात करुणा नसेल तर अनर्थ होईल.