शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
2
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
3
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
4
इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
6
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
7
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
8
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
9
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
10
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
11
३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
12
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
13
Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
14
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
15
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
16
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
17
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
18
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
19
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
20
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
Daily Top 2Weekly Top 5

ई पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

By admin | Updated: February 16, 2017 16:49 IST

तामिळनाडूत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अखेर ई पलानीस्वामी यांनी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

ऑनलाइन लोकमत चेन्नई, दि. 16 - तामिळनाडूत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अखेर ई पलानीस्वामी यांनी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची रवानगी  तुरुंगात झाली. मात्र तुरुंगात जाण्यापूर्वी शशिकलाने तिच्याशी निष्ठावंत असलेल्या पलानीस्वामी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. पनीरसेल्वम यांच्या मत्रिमंडळातील 31 मंत्र्यांना कायम ठेवले जाईल अशी माहिती आहे. 

राज्यपालांनी पलानीस्वामी यांना 15 दिवसात तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. ई. पलानीस्वामी यांनी पक्षाच्या समर्थक आमदारांची स्वाक्षरी असलेलं एक पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर राजभवनाने ते पत्र प्रसिद्धीस दिलं आहे. 

ई पलानीस्वामी यांनी एआयएडीएमकेच्या 124 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर ओ. पनीरसेल्वम यांच्या गोटात फक्त दहाच आमदार आहेत. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण मिळाल्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाची धुरा शशिकला यांच्याच हातात राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यपाल पलानीस्वामी आणि शशिकलांनी रिसॉर्टमध्ये आमदारांना बंधक बनवल्याच्या प्रकरणाचाही बारकाईनं अभ्यास करत आहेत. त्यानंतर पलानीस्वामी यांच्याकडे समर्थक आमदारांचं बहुमत असल्यानंच त्यांना सरकार स्थापण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे, असं राजभवनातून सांगितलं जात आहे. ई पलानीस्वामी यांना आज संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे.