शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोळा अंकी क्रमांकाने ई-केवायसी; आधार क्रमांक द्यायची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:26 IST

दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा सोळा आकडी व्हर्च्युअल क्रमांक देता येईल. ही सुविधा रविवारपासून सुरू झाली.

नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा सोळा आकडी व्हर्च्युअल क्रमांक देता येईल. ही सुविधा रविवारपासून सुरू झाली.कोणाही व्यक्तीच्या वैैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने सोळा आकडी व्हर्चुअल ओळख क्रमांकाची (व्हीआयडी) निर्मिती हे उचललेले पहिले पाऊल आहे. बँका व अन्य सेवांसाठी ही सुविधा ३१ आॅगस्टपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. एखाद्या सेवेसाठी ग्राहकाने आपला व्हर्च्युअल ओळख क्रमांक दिल्यानंतर तसे टोकन सेवा पुरविणाऱ्या कंपनीला प्राप्त होईल. सेवा पुरविणाºया कंपन्यांना ग्राहकाने आपली मर्यादित स्वरुपात माहिती पुरवावी असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. बँका व प्राप्तीकर खात्याला एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याची मुभा आहे. मात्र अन्य सेवा देणाºया कंपन्यांना आधारमधील नाव, पत्ता व छायाचित्र इतकीच माहिती मिळेल.फेशियन रेकग्निशन तंत्रही वापरणारआधारमधील माहिती सार्वत्रिक होऊ नये यासाठी आता संबंधित व्यक्तिची चेहºयावरुन ओळख पटविण्याचे तंत्रही यूआयडीएआयने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा देशात सर्वत्र येत्या आॅगस्टपासून उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहक देणार असलेल्या व्हर्चुअल ओळख क्रमांकाचा आपल्या यंत्रणेत वापर होण्यासाठी तांत्रिक सिद्धता करण्याकरिता बँका व अन्य सेवा कंपन्यांनाही पुरेसा वेळ मिळणार आहे. सेवा कंपन्यांनी व्हीआयडीचा वापर ३१ जुलैपासूनच सुरु केला तर त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी आकारण्यात येणारा २० पैैसे दंड भरावा लागणार नाही.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड