"आज राजकारणात प्रामाणिक लोकांना संधी मिळत आहे. प्रामाणिकपणा आणि कामगिरी ही आजच्या राजकारणाची पहिली अनिवार्य अट असणार आहे. भ्रष्टाचार ज्यांचा वारसा होता तोच भ्रष्टाचार आज त्यांच्यावरील ओझं बनला आहे. अनेक प्रयत्न करूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत. काही बदल अजूनही बाकी आहेत आणि देशातील तरूण वर्गालाच करायचे आहेत. राजकीय घराणेशाही देशासमोरी एक आव्हान आहे. त्याचं मूळासकट उच्चाटन होणं आवश्यक आहे. आता केवळ आडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चालले आहेत. परंतु घराणेशाही मूळापासून संपली नाही," असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते."स्वामी विवेकानंद म्हणत असतं जुन्या धर्मानुसार जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे. परंतु नवा धर्म सांगतो की जो स्वत:वर विश्वास ठेवत नाहीत ते नास्तिक आहेत. यापूर्वी देशात कोणती व्यक्ती राजकारणाकडे वळली तो बिघडत चालला आहे अशी धारणा होती. राजकारणाचा अर्थच तसा बनला होता. भांडण, लुटमार, भ्रष्टाचार या गोष्टी होत्या. लोकं म्हणत होती की सर्वकाही बदलू शकतं परंतु राजकारण नाही," असंही मोदी यावेळी म्हणाले. न घाबरणारे, स्वच्छ हृदयाचे, साहसी आणि महत्वाकांक्षी तरूणच राष्ट्राच्या भविष्याचा पाया आहेत असं स्वामी विवेकानंद म्हणत होते. ते तरूणांवर त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवत होते. देशाला प्रगतीपथावर नेण्याची संधी आपल्याला गमवायची नाहीये. पुढील २५-३० वर्षांचा कालावधी हा खुप महत्त्वाचा आहे. तरूण वर्गाला हे शतक भारताचं बनवावं लागेल. प्रत्येक आपल्या निर्णयात देशहित पाहिलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तरूणांनी पुढे आलं पाहिजे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक : पंतप्रधान मोदी
By जयदीप दाभोळकर | Updated: January 12, 2021 12:25 IST
अजून अनेक बदल शिल्लक, ते तरूण वर्गालाच पूर्ण करायचे आहेत; मोदींचं आवाहन
राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक : पंतप्रधान मोदी
ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला केलं संबोधितआडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चाललेत, मोदींचं वक्तव्य