विजयनगरम : शनिवारी पहाटे जेद्दाह येथे उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानात ‘डमी’ निकामी ग्रेनेड सापडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा भोंगळपणा उघड झाला. नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि एअर इंडियाने सारवासारव करताना विरोधाभासी विधाने केल्यामुळे गोंधळ आणखीच वाढला. एअरलाईनने या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न चालविला असतानाच राजू यांनी हे सुरक्षा यंत्रणोचे अपयश असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी मुंबई आणि हैदराबाद येथील एअर इंडियाच्या दोन प्रभारी अधिका:यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जबाबदारी निश्चित करण्यासाठी एअरलाईन आणि नागरी विमान सुरक्षा ब्युरोची एक संयुक्त चमू मुंबईला गेली आहे.
विमानात आढळलेल्या प्लास्टिकच्या आवरणातील वस्तूची तपासणी केल्यानंतर जेद्दाह येथील सुरक्षा अधिका:यांनी विमानाच्या पुढील प्रवासाला परवानगी दिल्याचे एअर इंडियाने एका पत्रकात म्हटले. त्यानंतर राजू यांनी स्पष्ट केले की, बोईंग 747-4क्क् या विमानाच्या बिझनेस श्रेणीत एक निष्क्रिय ग्रेनेड मिळाला असून त्यात कोणतेही स्फोटके नव्हती. फ्लाईट क्रमांक एआय 956 हे मुंबई- हैदराबाद- जेद्दाह मार्गावर होते
त्यातील प्रवाशांना कोणताही धोका नव्हता.
धाबे दणाणले; एकच तारांबळ
एअर इंडियाची एआय 965 ही फ्लाईट शुक्रवारी रात्री मुंबईहून हैदराबादमार्गे सौदी अरबस्तानात जेद्दाहला पोहोचल्यावर विमानात एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने काहीशी घबराट निर्माण झाली. सुरुवातीस ही वस्तू ‘स्टन ग्रेनेड’ (शत्रूला अचंबित करण्यासाठी वापरला जाणारा अघातक हातबॉम्ब) असावा, अशी आवई उठली होती. त्यातच हे बोईंग 747-4क्क् विमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडच्या अमेरिका दौ:यासाठी, वेळ पडली तर वापरता यावे यासाठी सज्ज करून ठेवलेले पर्यायी राखीव विमान होते, असे सांगितले गेल्याने या घटनेस अधिकच गांभीर्य आले.
परंतु जेद्दाह विमानतळावर हे विमान सुरक्षित स्थळी बाजूला नेऊन तपासणी केली असता त्यातील संशयास्पद वस्तू म्हणजे केवळ एक प्लॅस्टिकचे वेष्टन होते, असे निष्पन्न झाले. सुरक्षा तपासणीसाठी जेद्दाह येथे थांबवून ठेवलेले हे विमान लवकरच पुन्हा व्यापारी उड्डाणो करण्यासाठी कालिकतला परत आणले जाणार आहे.
अधिकृत सूत्रंनी सांगितले की, सुरक्षेच्या बाबतीत विमान कर्मचा:यांची तत्परता जोखण्यासाठी नॅशनल सेक्युरिटी गार्ड्सने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून देशातील निवडक विमानतळांवर घेतलेल्या ‘सेक्युरिटी ड्रील’चाच हा भाग होता. हे विमान पंतप्रधानांच्या अमेरिका दौ:यासाठी सज्ज करून ठेवलेले राखीव विमान होते याचाही एअर इंडियाने एका अधिकृत पत्रकान्वये इन्कार केला आहे. एअर इंडिया म्हणते की, हे विमान पंतप्रधानांसाठी वापरायचे संभाव्य विमान म्हणून कधीच राखीव नव्हते. वस्तुत: 25 सप्टेंबर ते 3क् सप्टेंबर या काळात मोदी अमेरिका दौ:यावर होते त्या काळात हे विमान दिल्ली-फ्रँकफर्ट मार्गावर व्यापारी उड्डाणांसाठी वापरले जात होते.
एअर इंडिया म्हणते की, हे जंबो जेट जेद्दाह येथे पोहेचताच
त्यातील बिझनेस क्लासच्या आसनाखाली एक ‘संशयास्पद वस्तू’ विमान कर्मचा:यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ स्थानिक सुरक्षा यंत्रणोस सावध केले व त्यानंतर विमानाची कसून तापसणी करण्यात आली. मात्र या संपूर्ण घटनाक्रमात प्रवासी अथवा विमानाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली गेली नाही, यावरही एअर इंडियाने भर दिला.
मॉक ड्रीलनंतर ग्रेनेड राहून गेला
मॉक ड्रीलनंतर बीएसएफचे चिन्ह असलेला ग्रेनेड राहून गेला. 24 ते 27 सप्टेंबर या काळात काही निवडक विमानतळांवर आणि विमानांमध्ये मॉक ड्रील पार पाडण्यात आली. चालक दलातील सदस्य आणि अन्य संबंधितांची सतर्कता जोखण्याचा त्यामागचा उद्देश होता. हा ग्रेनेड चुकून राहून गेला असला तरी प्रवाशांना कोणताही धोका नव्हता, पण या गलथानपणाकडे डोळेझाक करता येणार नाही, असे राजू यांनी पत्रपरिषदेत नमूद केले.
ते विमान मोदींसाठी नव्हते.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ:यावर गेले तेव्हा त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून एक विमान सज्ज ठेवण्यात आले होते, ते हेच विमान असल्याचे वृत्त ब्रेकिंग न्यूज बनले होते. राजू यांनी या वृत्ताचा इन्कार केला.