शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:55 IST

Dularchand Yadav News: मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या मृत्यू प्रकरणात संशस्यास्पद माहिती समोर आली.

मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या मृत्यू प्रकरणात संशस्यास्पद माहिती समोर आली. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या एका वक्तव्यामुळे या प्रकरणाला अनपेक्षित वळण आले. दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नसल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट केले आहे.

डॉ. अजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन डॉक्टरांच्या पथकाने दुलारचंद यादव यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले. डॉ. कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, "दुलारचंद यांना घोट्याजवळ गोळी लागली आणि ती गोळी पायातून पार झाली. अशा प्रकारच्या बंदुकीच्या गोळीने मृत्यू होणे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे."  तपासणीदरम्यान डॉक्टरांना दुलारचंद यादव यांच्या शरीरावर इतर अनेक जखमा देखील आढळून आल्याचे सांगण्यात आले.

डॉक्टरांच्या या विधानामुळे दुलारचंद यादव यांच्या मृत्यूचे मूळ कारण काय, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गोळीमुळे मृत्यू झाला नसल्यास, हाणामारीच्या वेळी नेमके काय घडले? ज्यामुळे त्यांचा जीव गेला, याबद्दलचे गूढ वाढले आहे. शवविच्छेदन पथक सर्व वैद्यकीय पुरावे आणि शरीरावरील जखमा विचारात घेऊन लवकरच आपला अंतिम अहवाल पोलिसांना सादर करणार आहे.

या घटनेमुळे मोकामा परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी आता अधिकृत वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आपला तपास सुरू ठेवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dulalchand Yadav's death not by gunshot, doctors reveal.

Web Summary : Doctors refute gunshot as cause of Dulalchand Yadav's death in Mokama. Post-mortem reveals other injuries. Investigations continue to determine the actual cause of death, fueling tension.
टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण