घरफोड्या करणा-या दुक्कलीस अटक
By admin | Updated: May 16, 2015 00:10 IST
पुणे : चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या परिसरातील बंगल्यांत दोन घरफोड्या करणा-या दुक्कलीस आणि त्यांच्याकडून दागिने खरेदी करणा-या सराफास अटक करण्यात आली.
घरफोड्या करणा-या दुक्कलीस अटक
पुणे : चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या परिसरातील बंगल्यांत दोन घरफोड्या करणा-या दुक्कलीस आणि त्यांच्याकडून दागिने खरेदी करणा-या सराफास अटक करण्यात आली. संकल्प सतिश शहा व विकी संजय बोरगावे (भेकराईनगर, हडपसर)अशी आरोपींची नावे असून अशोक जनार्दन टाक (भेकराईनगर, हडपसर)असे सराफाचे नाव आहे. वसंत हरी दाभोळकर (अंबिका सोसायटी) व रुपा प्रशांत देशमुख (शिवाजी हौसिंग सोसायटी) यांच्याकडे घरफोडी करुन सात तोळे सोन्याचे दागिने दोघांनी लंपास केले होते.पाषाण रस्त्यावर हे दोघे एका ठिकाणी येणार असल्याची माहीती समजल्यावर सापळा रचून त्यांना पकडले.वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण सावंत यांच्या सुचनेनुसार फौजदार राजाराम चौहान, तुषार पाचपुते, संजय वाघ, संजय शिंदे, विजय मोरे, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली.