शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लाट येणार नाही, दोन-तीन आठवड्यात सारं सुरळीत होणार!; तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 22:45 IST

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे घाबरून जाण्याची गरज नाही असेही सांगण्यात आले आहे

Coronavirus in India : देशात आणि जगात लोक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहेत याच दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.१ बद्दल सध्या नागरिकांमध्ये घबराट आहे. २१ डिसेंबरपर्यंत देशभरात नवीन व्हेरिएंटची एकूण २२ प्रकरणे समोर आली असून, सर्व रुग्णांमध्ये याची सौम्य लक्षणे आढळून आली बाब दिलासादायक आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक लोक याला नवी लाट मानत आहेत. पण, तज्ज्ञांचे मत पूर्णपणे भिन्न आहे. याला चौथी लाट म्हणायची गरज नाही. दोन-तीन आठवड्यांत हे सर्व काही सामान्य स्तरावर येईल असे म्हणले असून JN.1 मुळे कोणतीही लाट येण्याची शक्यता नाही असे अनेक जाणकारांचे मत आहे.

घाबरण्याची गरज नाही!

कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरिएंटने नक्कीच चिंता वाढवली आहे. पण, घाबरण्याची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याचे 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केले आहे. हा शेवटचा प्रकार नाही. भारतात JN.1 ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.

मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ.गौतम भन्साळी म्हणाले की, या आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप यांचा समावेश आहे. पण, परिणाम खूपच कमी असेल. मला वाटत नाही की याने कोणतीही लाट येईल. मुंबईत दहा प्रकरणे आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर थोडीफार वाढ होऊ शकते. लस आणि बूस्टर डोसनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ओमिक्रॉन वेव्हने संपूर्ण जगाला त्रास दिला होता. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मोठ्या संख्येने लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे लाट येणार नाही.

डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, इन्फ्लूएंझा ए (एच१एन१ आणि एच३एन२), एडेनोव्हायरस, राइनोव्हायरस आणि रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस यांसारख्या सीझनल फ्लूमुळे होणारे श्वसनाचे आजार मोसमी आजारांना कारणीभूत ठरू शकतात. हे कोविड-19 च्या लक्षणांसारखेच आहेत. ज्या लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढतो त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लस