शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 12:34 IST

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला.

रांची/पाटणा -  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. अनेक राज्यात स्थानिक पक्षांचा दारुण पराभव झाला. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांची दाणादाण उडाली. एकेकाळी बिहारच्या राजकारणावर एकछत्री वर्चस्व गाजवणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. दरम्यान, लोकसभेच्या निकालात आरजेडीच्या झालेल्या दारुण पराभवामुळे पक्षप्रमुख लालूप्रसाद यादव यांना धक्का बसला आहे. निकालांनंतर लालूप्रसाद यादव यांनी जेवण कमी केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या रांची येथील आरआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून लालू यादव हे सकाळी कसाबसा नाश्ता करतात. मात्र दुपारचे भोजन न करता थेट रात्री जेवण घेतात. त्यामुळे जेवण कमी केल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. ''आम्ही आपल्यपरीने त्यांची खूप समजूत घातल आहोत. अशाप्रकारे जेवण सोडणे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले नाही. जर त्यांनी वेळेत भोजन केले नाही तर त्यांना ओषध आणि इंशुलिन देण्यात अडचणी येतील. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले. तसेच निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यामुळे लालूंची अशी स्थिती झाली आहे का, असे विचारले असता डॉक्टरांनी आम्ही याबाबत त्यांना काहीही विचारलेले नाही. मात्र तुम्ही निष्कर्ष काढू शकता, असेही सांगितले.    मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी ही बाब फेटाळून लावली आहे. लालूजींसाठी ही काही पहिली निवडणूक नाही, असे सांगत पराभावमुळे लालूप्रसाद यादव तणावात असल्याचे वृत्त फेटाळले. तर लालूप्रसाद यादव यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात कडवे आव्हान उभे करण्याचे आदेश दिले आहेत, असे अन्य एका आमदाराने सांगितले.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाने एकतर्फी विजय मिळवताना 40 पैकी 39 जागांवर कब्जा केला. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीला एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीसाठी आरजेडीने काँग्रेस, आरएलएसपी, हम आणि व्हीआयपी या पक्षांसोबत महाआघाडी केली होती.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019