शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विधान भवनाला भुतांनी झपाटले?, पुजा-याकडून विधिवत शुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:54 IST

राज्यातील जनतेचे कल्याण करणे हे तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असते. पण लोकप्रतिनिधींनीच भुतांची धास्ती घेतली आहे.

जयपूर : राज्यातील जनतेचे कल्याण करणे हे तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असते. पण लोकप्रतिनिधींनीच भुतांची धास्ती घेतली आहे. भुतांपासून रक्षणासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यामुळेच गुरुवारी विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावर भुताचा प्रभाव घालवण्यासाठी पुजारी विधी करताना पाहायला मिळाले! हा प्रकार राजस्थानात घडला आहे.राजस्थान विधानसभा एकूण २०० सदस्यांची आहे. परंतु गेली अनेक वर्षे एकाच वेळी २०० आमदारांची संख्या पूर्ण झालेली नाही. राजीनामा, आकस्मिक निधन किंवा खटल्यात शिक्षा झाल्याने तुरुंगात रवानगी यामुळे सभागृहात एका वेळी २00 आमदार कधीच नसतात. विधान भवनावर भुतांचा प्रभाव असल्यानेच हे होत आहे, अशी बहुतांश आमदारांची धारणा आहे. आमदार हबिबूर रहमान म्हणाले की, विधान भवनाआधी ही जागा अंत्यसंस्कारासाठी तसेच कबर बांधण्यासाठी वापरली जात असे. अशा ठिकाणी भुते भटकतअसतात.  मंगळवारी भाजपा आमदार कल्याणसिंह चौहान यांचा मृत्यू झाल्याने सारेच आमदार घाबरले आहेत. सैतानी शक्तीविरोधात उपाययोजना करण्याची मागणी ते करू लागले. मागील आ. कीर्ती कुमारी यांचे निधन झाले. त्याआधी बसपाचे आ. बी. एल. कुशवाह यांना तुरुंगात जावे लागले. काँग्रेस आ. महिपाल मदरेना, मलखन सिंग बिष्णोई व बाबूलाल नागर यांनाही तुरुंगात जावे लागले. त्यामुळे इथे भूत, सैतानी शक्तीचा वावर आहे, असे अंधश्रद्धाळू आमदारांना ठामपणे वाटते.