शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे हाहाकार, नासाने उपग्रहाद्वारे टिपली धुके आणि प्रदूषणाची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 03:53 IST

राजधानी दिल्लीतील हवा दिवसेंदिवस खराब होत चालल्याने दिल्ली सरकारने वाहनांसाठी १३ नोव्हेंबरपासून ५ दिवसांसाठी सम-विषम योजना लागू करण्याची घोषणा केली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हवा दिवसेंदिवस खराब होत चालल्याने दिल्ली सरकारने वाहनांसाठी १३ नोव्हेंबरपासून ५ दिवसांसाठी सम-विषम योजना लागू करण्याची घोषणा केली. शहराच्या प्रदूषणात गंभीर वाढ झाल्यानंतर हे पाउल उचलण्यात आले आहे.खासगी वाहने नंबर प्लेटच्या शेवटच्या अंकानुसार सम-विषम गृहीत धरले जातील. सम तारखेला सम नंबरची वाहने तर, विषम तारखेला विषम नंबरची वाहने रस्त्यावर धावतील. बांधकामांवरही बंदी घालण्यात आली असून, रस्त्यांवर कमीत कमी वाहने यावीत,यासाठी पार्किग फी प्रचंड वाढवण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यकवस्तू वगळता अन्य सामानाचे ट्रक दिल्लीत आणण्यास बंदी घालण्यात आली.दिल्लीतील प्रदूषणाबद्दल राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकार, महापालिका आणि शेजारी राज्यातील सरकारांना फटकारले आहे. प्रदूषणावर अंकुश आणणे ही संयुक्त सर्व राज्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत लोकांच्या जीवनाशी हा खेळ सुरू असल्याबद्दल हरित लवादाने नाराजी व्यक्त केली. हरित लवादाने म्हटले आहे की, नागरिकांना जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. यापूर्वीच्या आदेशानंतरही शहरातील बांधकाम थांबलेले नाही. हरित लवादाने १० वर्षांपूर्वीची डिझेल वाहने आणि १५ वर्षांपूर्वीची पेट्रोल वाहने यांना शहरात प्रवेशास बंदी करा, असे याआधी केंद्र व दिल्ली सरकारला सांगितले होते.प्रदूषणामुळे जीवन आणि आरोग्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांंगत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुरुवारी केंद्र सरकार तसेच दिल्ली, पंजाब आणि हरयाणा सरकारांना नोटिसा पाठविल्या आहेत. आवश्यक पावले न उचलणाºया अधिकाºयांनाही आयोगाने फैलावर घेतले.विविध केंद्रीय मंत्रालये आणि तीन राज्य सरकार यांना उपाययोजनांबाबत दोन आठवड्यांच्या आत अहवाल मागविला आहे.मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, विषारी वायू, धुके या कारणामुळे सरकार नागरिकांना मरण्यासाठी सोडून देऊ शकत नाही. केंद्रीय पर्यावरण, आरोग्य आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांसह दिल्ली, पंजाब आणि हरियाणा सरकारांच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करण्यात आली आहे.