शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाहिन्यांच्या पॅकेजमुळे वाढली ग्राहकांची डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 05:23 IST

ट्रायची नवी नियमावली; सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल्स महाग

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने दूरचित्र वाहिन्यांबाबत नवीन नियमावली जाहीर केली असली, तरी त्याची नेमकी अंमलबजावणी कशी होणार, याबाबत अद्याप साशंकता कायम आहे. तर दुसरीकडे विविध वाहिन्यांनी सद्य:परिस्थितीत जाहीर केलेल्या पॅकेजचे एकत्रित गणित पाहता, ग्राहकांना १०० नि:शुल्क वाहिन्यांसाठी १३० रुपये, त्यानंतर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ५५ सशुल्क वाहिन्यांसाठी ४२८ रुपये असे मिळून ५५८ रुपये अधिक १८ टक्के जीएसटी (१०१ रुपये) अशा प्रकारे ६५९ रुपये शुल्क भरावे लागेल.एकीकडे याची अंमलबजावणी करण्यासाठी ट्राय आग्रही असताना केबल चालकांनी मात्र त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत असहकार्य करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. नियमावलीची अंंमलबजावणी करण्यासाठी केबल चालकांच्या माध्यमातून ग्राहकांना वाहिन्यांच्या निवडीचे अर्ज देऊन ते भरून घेणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप असे अर्ज भरून घेतले नसल्याने ग्राहकांच्या आवडीच्या वाहिन्यांची माहिती कशी मिळणार व त्याची अंमलबजावणी कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.नि:शुल्क वाहिन्यांपैकी पहिल्या १०० वाहिन्यांसाठी १३० रुपये आकारण्यात येणार आहेत. तर त्यापुढील प्रत्येक २५ वाहिन्यांसाठी २० रुपये आकारले जातील व त्या सर्वांवर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वाहिन्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. जर, एखाद्या कुटुंबाने केवळ १०० नि:शुल्क वाहिन्या व इतर सशुल्क मराठी वाहिन्या पाहण्याचे ठरवल्यास त्यांना बेसिक पॅकेज - १३० रुपये, झी मराठी - १९ रुपये, सोनी मराठी - ४ रुपये, स्टार प्रवाह - ९ रुपये, कलर्स मराठी - १० रुपये, झी टॉकिज - १२ रुपये, झी २४ तास - ५० पैसे, एबीपी माझा - ५० पैसे, झी युवा - ४ रुपये, अशा प्रकारे १०० नि:शुल्क वाहिन्यांसाठी १३० रुपये व ८ सशुल्क वाहिन्यांसाठी ५८ रुपये असे एकूण १८८ रुपये व त्यावर १८ टक्के जीएसटीचे ३४ रुपये असे एकूण २२२ रुपये द्यावे लागतील.जर एखाद्या कुटुंबाने हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेतील वृत्तवाहिन्या, संगीत, क्रीडा, चित्रपट, मनोरंजनात्मक, माहिती व बाल अशा विविध वाहिन्या पाहायच्या ठरवल्यास बेसिक पॅकेज - १३० रुपये, अ‍ॅण्ड फ्लिक्स - १५ रुपये, अ‍ॅण्ड पिक्चर - १० रुपये, अ‍ॅण्ड टीव्ही - १२ रुपये, आजतक - ७५ पैसे, बीबीसी वर्ल्ड न्यूज - १ रुपया, एबीपी माझा - ५० पैसे, अ‍ॅनिमल प्लॅनेट - २ रुपये, कार्टून नेटवर्क - ४.२५ रुपये, कलर्स - १९ रुपये, कलर्स मराठी - १० रुपये, डिस्कव्हरी - ४ रुपये, डिस्ने ज्युनियर - ४ रुपये, हंगामा - ६ रुपये, एमटीव्ही म्युझिक - ३ रुपये, मुव्हिज ओके - १ रुपया, मुव्हिज नाऊ - १० रुपये, सोनी मिक्स - १ रुपया, न्यूज १८ लोकमत - २५ पैसे, न्यूज १८ इंडिया - १ रुपया, सोनी पिक्स इंग्रजी - १० रुपये, पोगो - ४.२५ रुपये, सब - १९ रुपये, सेट मॅक्स - १५ रुपये, सोनी - १९ रुपये, सोनी मराठी - ४ रुपये, स्टार मुव्हिज - १२ रुपये, स्टार प्लस - १९ रुपये, स्टार गोल्ड - ८ रुपये, स्टार प्रवाह मराठी - ८ रुपये, स्टार स्पोर्ट्स - १९ रुपये, टेन स्पोर्ट्स - १९ रुपये, डिस्ने किड्स - ८ रुपये, द हिस्ट्री - ३ रुपये, झी टॉकीज - १२ रुपये, झी टीव्ही - १९ रुपये, झी युवा - ४ रुपये, झी मराठी - १९ रुपये, झी बॉलीवूड - २ रुपये, युटीव्ही मुव्हिज - २ रुपये, टाइम्स नाऊ - ३ रुपये, स्टार वर्ल्ड - ८ रुपये, टेन स्पोर्ट्स इंग्रजी - १५ रुपये, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट - १९ रुपये, स्टार गोल्ड - ७ रुपये, स्टार भारत हिंदी - १० रुपये, सोनी वाह - १ रुपया, सोनी किड्स - २ रुपये, सोनी बीबीसी अर्थ - ४ रुपये, रिश्ते मुव्हिज - ३ रुपये, निक किड्स - ६ रुपये, मिरर नाऊ - २ रुपये, एचबीओ मुव्हिज - १० रुपये, ईटी नाऊ - ३ रुपये, सीएनबीसी इंग्रजी - ४ रुपये, आजतक - २५ पैसे, अशा प्रकारे १०० नि:शुल्क वाहिन्यांसाठी १३० रुपये, त्यानंतर ५५ सशुल्क वाहिन्यांसाठी ४२८ रुपये अशा प्रकारे ५५८ रुपये, १८ टक्के जीएसटीप्रमाणे १०१ रुपये अशा प्रकारे ६५९ रुपये शुल्क भरावे लागेल. ज्यांना कमी प्रमाणात वाहिन्या पाहायच्या आहेत त्यांना आतापेक्षा कमी शुल्क भरावे लागेल, मात्र ज्यांना जास्त वाहिन्या पाहायच्या आहेत त्यांना आतापेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल.मागण्या मान्य होईपर्यंत असहकार्यनियमावलीची अंंमलबजावणी करण्यासाठी केबल चालकांच्या माध्यमातून ग्राहकांना वाहिन्यांच्या निवडीचे अर्ज देऊन ते भरून घेणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप असे अर्ज भरून घेतले नसल्याने ग्राहकांच्या आवडीच्या वाहिन्यांची माहिती कशी मिळणार व त्याची अंमलबजावणी कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. केबल चालकांनीही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत असहकार्य करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय