महापालिकेने पाण्याचे राजकारण करू नये टंचाई : उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनीला पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
By admin | Updated: November 4, 2015 23:29 IST
जळगाव : जळगाव तालुक्याच्या हद्दीत येणार्या उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनी या चार ठिकाणी तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, पाण्याच्या बाबतीत महापालिकेने राजकारण करू नये अशी तंबी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी टंचाई निवारण बैठकीत बुधवारी मनपा अधिकार्यांना दिली.
महापालिकेने पाण्याचे राजकारण करू नये टंचाई : उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनीला पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
जळगाव : जळगाव तालुक्याच्या हद्दीत येणार्या उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनी या चार ठिकाणी तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, पाण्याच्या बाबतीत महापालिकेने राजकारण करू नये अशी तंबी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी टंचाई निवारण बैठकीत बुधवारी मनपा अधिकार्यांना दिली.जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात झालेल्या पाणी टंचाई बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी तालुक्यातील उमाळा, सावखेडा तसेच वाघ नगर व सुप्रिम कॉलनी येथील नागरिकांकडून पाण्याची मागणी केल्यानंतर देखील मनपाकडून अडवणुकीचे धोरण ठेवत पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. मनपाच्या या धोरणाबाबत महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने राजकारण करू नये अशा शब्दात प्रभारी आयुक्त साजीद पठाण व पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना बजावले. पाणी पीच्या करापोटी औद्योगिक वसाहतीचा ११ कोटी रुपयांचा महसूल मनपाकडे बाकी आहे. तसेच मागच्या काळात वाघूर धरणाची उंची वाढविण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला. वाघूर धरणातून पाहिजे तितके पाणी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तरी देखील या गावांना पाणी का दिले जात नाही असा जाब त्यांनी विचारला. संबधित गावाच्या ग्रामपंचायती पाणीपी भरण्यास तयार असताना काय अडचण आहे अशी विचारणा त्यांनी केली.या गावांना पाणी देण्यासाठी महासभेची मान्यता आवश्यक असल्याचे खडके यांनी सांगितले. त्यावर महासभा लावून हा विषय मंजुरीसाठी ठेवावा अशी सुचना साजीद पठाण यांनी खडके यांना केली. यावेळी हरि विठ्ठल नगर भागात पिवळे व अशुद्ध पाण्याच्या तक्रारी असल्याचे सुरेश भोळे यांनी सांगितले. त्यावर मनपा प्रशासनाकडून पाण्याचे नमुणे घेऊन ते तपासणीसाठी पाठविल्याचे तहसीलदार गोविंद शिंदे यांनी सांगितले.