शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

विमानात लँडिंगदरम्यान राष्ट्रगीत सुरू झाल्यानं प्रवाशांची पंचाईत

By admin | Updated: April 23, 2017 20:34 IST

विमान उतरण्याच्या बेतात होते आणि सर्व प्रवासी आपापल्या आसनावर पट्टा बांधून बसले होते

ऑनलाइन लोकमतइंदोर, दि. 23 - विमान उतरण्याच्या बेतात होते आणि सर्व प्रवासी आपापल्या आसनावर पट्टा बांधून बसले होते. अशा परिस्थितीत अचानक विमानातील सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेवर राष्ट्रगीत सुरू झाले आणि प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. विमान प्रवासादरम्यानच्या नियमांचे पालन करावे की, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहावे, काय करावे? हे प्रवाशांना सुचेनासे झाले. हा प्रकार स्पाईस जेटच्या तिरुपती ते हैदराबाद या हवाई मार्गावरील विमानात घडला. अशा पंचाईतीला सामोरे जावे लागलेल्या प्रवाशांना एअर लाईन्सकडे तक्रार दिली आहे. स्पाईट जेटच्या या विमानातील (एसजी-1044) कर्मचाऱ्याने विमान उतरण्याच्या बेतात असताना राष्ट्रगीताची धून वाजविली. आता काय करावे, हे प्रवाशांना सुचेनासे झाले आणि बसल्या जागी पट्टा बांधून बसणे आम्हाला भाग पडले, असे पुनीत तिवारी या प्रवाशाने सांगितले. विमानातील अन्य एका कर्मचाऱ्याने मध्येच ही वाजणारी धून थांबविली आणि नंतर पुन्हा सुरू केली. पुनीत हे पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीसोबत या विमानाने प्रवास करीत होते. आमच्या कर्मचाऱ्याने चुकीच्या नंबरची धून निवडल्याने राष्ट्रगीताची धून सुरू झाली. तथापि ती तात्काळ बंद करण्यात आली. या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, अशी स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.