दाट धुक्यामुळे दिल्लीत रेल्वे वाहतूक ठप्प, ३२ गाड्यांना विलंब, पारा घसरला
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
नवी दिल्ली : दिल्लीत थंडीची लाट परतली असून शुक्रवारी सर्वत्र दाट धुके पसरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. धुक्यामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला असून ३२ रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत शुक्रवारी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते.
दाट धुक्यामुळे दिल्लीत रेल्वे वाहतूक ठप्प, ३२ गाड्यांना विलंब, पारा घसरला
नवी दिल्ली : दिल्लीत थंडीची लाट परतली असून शुक्रवारी सर्वत्र दाट धुके पसरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. धुक्यामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला असून ३२ रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत शुक्रवारी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते.सकाळी ८.३० वाजता आर्द्रताही ९७ टक्के तर दृश्यमानता ६०० मीटरपर्यंत होती. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडे जाणाऱ्या ३२ गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत आहे.काश्मिरात थंडीचा कहर कायम, कारगील गोठलेश्रीनगरहून मिळालेल्या माहितीनुसार काशिमरात थंडीची लाट कायम आहे. कारगील येथे शुक्रवारी उणे २१ अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. कारगीलमध्ये गुरुवारी उणे २१ अंश सेल्सिअस तापमान होते. राजधानी श्रीनगरमध्येही उणे १.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.पंजाब, हरियाणात थंडीची लाटचंदीगड : पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट कायम आहे. पंजाबच्या अमृतसर येथे शुक्रवारी सर्वांत कमी म्हणजे ३ अंश सल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. लुधियाना आणि पटियाला येथे अनुक्रमे ४.८ आणि ७ अंश सल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. (वृत्तसंस्था)