शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक सुखवस्तू झाल्याने मागासलेपण नष्ट होत नाही, केंद्राचा युक्तिवाद मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:50 IST

राष्ट्रपतींनी एकदा एखादा समाज मागास असल्याचे ठरवून त्याचा समावेश संबंधित अनुसूचित केल्यानंतर बढत्यांमधील आरक्षणाच्या वेळी त्या समाजाचे मागासलेपण पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही, हा केंद्र सरकारने केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केला.

नवी दिल्ली  -  राष्ट्रपतींनी एकदा एखादा समाज मागास असल्याचे ठरवून त्याचा समावेश संबंधित अनुसूचित केल्यानंतर बढत्यांमधील आरक्षणाच्या वेळी त्या समाजाचे मागासलेपण पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही, हा केंद्र सरकारने केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केला. मात्र, सरकारी सेवेत आला व आर्थिकदृष्ट्या थोडा सुखवस्तू झाला म्हणून मुळात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या असलेल्या कर्मचाऱ्याचे मागासलेपण व पूर्वापार चालत आलेला अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा होत नाही.त्यामुळे या कर्मचाºयांना बढत्यांमध्ये आरक्षण देताना ‘क्रीमी लेयर’चे तत्त्व लागू केले जाऊ नये, हे सरकारचे म्हणणे न्यायालायने अमान्य केले. न्यायालयाने म्हटले की, मागास समाजातील तुलनेने सुखवस्तू व्यक्तींनीच आरक्षणाचे सर्व लाभ मिळवून त्यांच्याहून मागासांना वंचित राहावे लागू नये, यासाठी हे तत्त्व लावणे गरजेचे आहे.सरकारी सेवांमध्ये संबंधित समाजास पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे की नाही, हे ठरविताना त्या समाजाचे एकूण लोकसंख्येमधील प्रमाण हा निकष असावा, असाही केंद्र सरकारचा आग्रह होता. मात्र, ते अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, जेथे असा निकष लावायचा तेथे राज्यघटनेत तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.दरम्यान, कास्ट्राईब कर्मचारी महासंघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या महासंघाच्या लढ्याला न्यायालयाच्या निर्णयामुळे यश मिळाले, असे इंगळे यांनी सांगितले.संसद व विधिमंडळातील राखीव जागा या त्याप्रमाणे ठरविल्या जातात. मात्र, नोकºयांमधील आरक्षणासही तोच निकष लावणे राज्यघटनेस अपेक्षित नाही. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता अबाधित ठेवून मागास समाजांना किती प्रतिनिधित्व द्यायचे हे सरकारने गुणवत्तेवर विचार करून ठरवायचे आहे.राज्यातील प्रकरणाचे काय?महाराष्ट्र सरकारने बढत्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी सन २००४ मध्ये केलेला कायदा उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्यानंतर आता ते प्रकरण अपिलात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.उच्च न्यायालयाने तो निकाल प्रामुख्याने नागराज निकालाच्या आधारे दिला होता. आता नागराज निकालातील एक महत्त्वाचा मुद्दा रद्द झाला असला तरी सन २००४ चा कायदा टिकविण्यासाठी राज्य सरकारला या ताज्या निकालाचा फारसा फायदा होईल, असे दिसत नाही. कारण हा निकाल पूर्वलक्षी नसल्याने आधी केलेल्या कायद्यांना तो लागू होणार नाही.आताच्या निकालाच्या आधारे नवा कायदा करून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करीत आरक्षणाने दिलेल्या बढत्या वाचविणे हा सरकारसाठी तुलनेने अधिक सोयीचा मार्ग आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण