शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शाही इमामाच्या फतव्यामुळे माझा पराभव किरण बेदी यांचा दावा

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी आम आदमी पार्टीला मतदान करण्याबाबत जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काढलेल्या फतव्यामुळेच आपला पराभव झाला, असा दावा भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी यांनी बुधवारी केला. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी आम आदमी पार्टीला मतदान करण्याबाबत जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काढलेल्या फतव्यामुळेच आपला पराभव झाला, असा दावा भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी यांनी बुधवारी केला. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
पूर्व दिल्लीतील भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कृष्णानगर मतदारसंघातून त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. मतदानाच्या पूर्वसंध्येला ६ फेब्रुवारी रोजी शाही इमाम यांनी मुस्लीम मतदारांना केलेल्या आवाहनाचा निकालावर काय परिणाम झाला याबाबत निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे, असे मत त्यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मतमोजणीत सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आपण आघाडीवर होतो. परंतु मुस्लिमबहुल भागातील मतांची मोजणी सुरू होताच आपली पीछेहाट झाली, असा बेदी यांचा दावा आहे.
कृष्णानगरमध्ये बेदी यांना त्यांचे प्रतिस्पर्धी आपचे उमेदवार एस. के. बग्गा यांनी २,२७७ मतांनी पराभूत केले. (वृत्तसंस्था)