शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कर्तृत्वास संकटांमुळे झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 2:55 AM

काँग्रेसमधील फूट परिस्थितीने इंदिराजींवर लादली. व्ही. व्ही. गिरी यांना डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी एकतर्फी ठरविली नसती, तर काँग्रेस फुटली नसती.

-प्रेम शंकर झा(ज्येष्ठ पत्रकार)काँग्रेसमधील फूट परिस्थितीने इंदिराजींवर लादली. व्ही. व्ही. गिरी यांना डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी एकतर्फी ठरविली नसती, तर काँग्रेस फुटली नसती. काँग्रेस अध्यक्ष एस. निजिलिंगप्पा यांनी पदावरील पंतप्रधानांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंदिराजींना ताकद दाखवावी लागली. यात स्वार्थ होता, असे टीकाकार म्हणतात. पण पक्षाहून पंतप्रधानपदाचे व पक्ष संघटनेहून संसदीय पक्षाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना बंड पुकारणे भग पडले.इंदिरा गांधी या भारताच्या सर्वाधिक करिष्माई पंतप्रधान होत्या, तशाच वादग्रस्तही. काँग्रेसमध्ये दोन वेळा पाडलेली फूट, सत्ता स्वत:च्या हातात केंद्रित करण्यासाठी स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांना वारंवार बदलणे आणि आणीबाणी लादणे यावरून त्यांच्यावर लोकशाही खिळखिळी केल्याची टीका होते. देशाची आर्थिक धोरणे पार डाव्या टोकाला नेल्याबद्दल अर्थतज्ज्ञ त्यांना दोष देतात. पण माझ्या मते यापैकी कोणत्याही कारणावरून इंदिराजींना व्यक्तिश: दोष देणे अन्यायाचे होईल. उलट मी म्हणेन की हे सर्व टीकेचे मुद्दे त्या वेळी देशापुढे वा काँग्रेसपुढे उभी ठाकलेली गंभीर संकटे होती. यांवर इंदिराजींनी मात केल्यानेच त्यांच्या कर्तृत्वास झळाली आली.इंदिराजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वामुळे, आता मागे वळून पाहताना, त्यांनी सत्ता स्वीकारली तेव्हाची परिस्थिती किती कठीण होती, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. अन्नधान्याची टंचाई, १९६२ व १९६५ मधील लागोपाठची दोन युद्धे, १९६५ चा भीषण दुष्काळ आणि आकाशाला भिडलेली महागाई व चलनवाढ यामुळे भारताची भुकेकंगाल अवस्था झाली होती. अशा वेळी इंदिराजींनी सत्तासूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांच्यापुढील काँग्रेसमधील आव्हानेही कमी नव्हती. नेहरूंचा करिष्मा आणि मोराराजी देसार्इंपेक्षा जरा मवाळ म्हणून पक्षातील सिंडिकेटने त्यांची निवड केली, असे बहुतेकांना वाटते. पण नेहरूंच्या समाजवादी कारभाराने पक्षनेत्यांचा भ्रमनिरास झाला होता, हेही त्यामागचे एक कारण होते. इंदिराजींनी लगेचच रुपयाचे ५७ टक्के अवमूल्यन करून आपले धाडसी रूप दाखवून दिले. त्यानंतर हरित क्रांतीने भारताची स्थिती स्थिरस्थावर झाली.सन १९७१ च्या निवडणुकीनंतर काही दिवसांतच बांगलादेशचे संकट उभे ठाकले आणि इंदिराजींनी पंतप्रधान कसा कणखर हवा, हे दाखवून दिले. प्रचंड देशाभिमान व सुस्पष्ट दृष्टिकोन याचे ते उदाहरण होते. पूर्व पाकिस्तानातून आलेले एक कोटी निर्वासित निमूटपणे सामावून घ्यावे, यासाठी पाश्चात्त्य नेते भारतावर दबाव आणत होते. पाकिस्तानचे तुकडे करण्याचे इंदिराजींनी आधीपासूनच पक्के ठरविले होते, असा सर्वमान्य समज आहे. पण तो बरोबर नाही.निर्वासितांचे लोंढे असह्य झाले तेव्हा त्यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करून अवामी लीगला पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करू द्यावे, यासाठी जनरल याह्या खान यांचे मन वळविण्याचा आपल्या परीने खूप प्रयत्न केला. त्यात अपयश आले तेव्हा शेख मुजिबुर रेहमान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याकरता त्यांनी अनेक प्रमुख देशांमध्ये दूत पाठविले व स्वत:ही अनेक युरोपीय देश व अमेरिकेत जाऊन प्रयत्न केले. पण हे प्रयत्न फसलेच तर नाइलाजाने पूर्व पाकिस्तानवर चाल करण्याची दुसरी पर्यायी योजना त्यांनी तयार करून ठेवली. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देण्याचे निर्देश भारतीय लष्करास दिले.अशा प्रकारे प्रसंगी गाजर दाखवून किंवा दंडुका उगारून आपला हेतू जिद्दीने साध्य करून घेण्याची इंदिराजींची ही दुसरी वेळ होती. दोन्ही वेळा त्यांना यश आले. आधी व्ही. व्ही. गिरी यांची राष्ट्रपतीपदी निवड व नंतर बांगलादेशची निर्मिती हे त्याचे फलित होते. दोन्ही वेळेला त्यांनी नाइलाजाने शेवटचा उपाय म्हणून बळाचा वापर केला, असे दिसते.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष