शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Drugs Case : समीर वानखेडेंची उद्याच चौकशी होणार, दिल्लीहून टीम मुंबईत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:03 IST

प्रभाकर यांच्या आरोपानंतर याप्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत

ठळक मुद्देकिरण गोसावी यानं एनसीबीच्या कार्यालयाजवळच सॅम डिसोजा नावाच्या व्यक्तीची भेट घेतली होती आणि त्यांच्या व्यवहारासंबंधी बोलणं सुरू होतं. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं आहे.

मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) टाकलेल्या छाप्यानं चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या वादात सापडले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांच्या दाव्यांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. आता, याप्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी, एनसीबीचे अधिकारी दिल्लीतून मुंबईत येणार आहेत.  

प्रभाकर यांच्या आरोपानंतर याप्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. साईल यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी आढावा बैठकीसाठी वानखेडेंना दिल्लीत बोलावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, दुसरीकडे वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीचं पथक दिल्लीहून मुंबईला येणार असल्याचे समजते. उद्याच 26 ऑक्टोबर रोजी वानखेडेंची चौकशी करण्यात येणार असून त्याची जबाबदारी ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. या पथकात ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह 2 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. दरम्यान, वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

साईल यांचे वानखेडेंवर गंभीर आरोप

किरण गोसावी यानं एनसीबीच्या कार्यालयाजवळच सॅम डिसोजा नावाच्या व्यक्तीची भेट घेतली होती आणि त्यांच्या व्यवहारासंबंधी बोलणं सुरू होतं. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं आहे. एनसीबीच्या या कारवाईचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांच्या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर प्रभाकर साईल आज एनसीबी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील गुन्हे शाखेत पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं प्रभाकर साईल यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSameer Wankhedeसमीर वानखेडेMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थ