नमकीन कारखान्यावर औषध प्रशासनाची धाड
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: वेगवेगळ्या नावाचे लेबलही जप्त
नमकीन कारखान्यावर औषध प्रशासनाची धाड
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: वेगवेगळ्या नावाचे लेबलही जप्तफोटो- बोचरे..सोलापूर: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. परिसरातील बेकायदेशीर सुरु असलेल्या यश पॅकिंग फूड्सवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली असून दोन लाख 81 हजार 883 रुपयांचा नमकीनचा साठा जप्त केला आहे.सोलापूर शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या नमकीन फूड्स पॅकिंग केले जाते. अशा पॅकिंगसाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची परवानगी घेतली नाही व नियमाप्रमाणे फूड बनविलेही जात नाही. बुधवारी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या अधिकार्यांनी यश नमकीन पॅकिंगवर धाड टाकली. यावेळी अक्कलकोट रोडवर फूड तयार करुन तेथेच पॅकिंग केले जात असताना विविध पत्त्याचे लेबल चिकटावले जात असल्याचे अन्नसुरक्षा अधिकार्यांच्या तपासणीत लक्षात आले. स्वत:च्या कारखान्याचे लेबल व अन्य लेबल जप्त करण्यात आले. अशा प्रकारच्या केलेल्या विविध प्रकारच्या लेबलमधील ‘पॅकिंग’पुड्या जप्त केल्या. यश नमकीनचे मालक गिरीधारी निरंकारी असल्याचे सांगण्यात आले. 0 यश फूड प्रोडक्टला अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नाही0 प्रभारी सहाय्यक आयुक्त (अन्न) नीलेश मसारे, अन्नसुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम, विठ्ठल लोंढे यांनी केली कारवाई0 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले0 ‘कॉर्नफुल’(मद्यार्क) चा होत होता वापर0 मोनोसोडियम ग्लुटामेट (आजिनिमोटो) चा चव वाढीसाठी केला जात होता वापर0 पोगो, ‘व्हीलस्’, ‘एस.एम.एस.’ या आकर्षक नावाचे लेबल पॅकिंगचौकटबालकांसाठी रंग धोकादायकअन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी जप्त केलेला रंग लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ‘सिंथेटिक’ रंग वापरून नमकीन तयार केले जात होते. हा रंग लहान मुलांसाठी धोकादायक आहे. तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. कोटशहर व जिल्?ात अशा प्रकारच्या बेकायदेशीर सुरू असलेल्या ‘नमकीन’ तयार करणार्या ठिकाणावर धाडी टाकण्यात येतील. नागरिकांनी अशा ठिकाणची माहिती आम्हाला कळवली पाहिजे. लहान मुलांच्या जीवाला धोका होईल, असे पदार्थ तयार करणार्यांवर कारवाई करणार.नीलेश मसारेप्र. सहाय्यक आयुक्त (अन्न)