शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बुडणारे बेट वाचविणार!

By admin | Updated: March 17, 2017 00:52 IST

कोल्लम जिल्ह्यातील मुनरो थुरुट हे गाव असलेले बेट वाचविण्यासाठी वैज्ञानिक साहाय्य घेतले जाईल, असे केरळ सरकारने मंगळवारी सांगितले

कोच्ची : कोल्लम जिल्ह्यातील मुनरो थुरुट हे गाव असलेले बेट वाचविण्यासाठी वैज्ञानिक साहाय्य घेतले जाईल, असे केरळ सरकारने मंगळवारी सांगितले. त्सुमानीनंतर जमिनीची झालेली धूप आणि समुद्राच्या वाढत्या स्तरामुळे हे गाव बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. २००४ च्या त्सुनामीत मुनरो बेटाचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आणि मासेमारी क्षेत्रालाही प्रचंड झळ बसली होती, असे विजयन म्हणाले. भरतीमुळे वाढत असलेला जलस्तर आणि अष्टामुडी तलावातून झिरपणाऱ्या क्षारयुक्त पाण्यामुळे या बेटाच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाला आहे. बेटावरील अनेक घरेच उद्ध्वस्त झाली असून, रस्ते आणि पदपथांचेही तीनतेरा झाले आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज् यासारख्या वैज्ञानिक संस्थेची मदत घेतली जाईल. बेट वाचवण्यासाठी हे गरजेचे असून, तलावातील क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव रोखण्यासाठी बांध घालणे, तसेच खारफुटीची लागवड करणे आदी इतर उपायही करण्यात येणार आहेत, असे विजयन म्हणाले.जगणे कठीण झाल्यामुळे ४०० कुटुंबांनी बेट सोडले आहे. एकेकाळी येथील भातशेती प्रसिद्ध होती, तसेच नारळाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते; मात्र आता ही परिस्थिती बदलली असून, कृषी क्षेत्र कोलमडले आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे लोकांना त्वचारोग होत आहेत, असे कोवूर म्हणाले. या बेटावर आजही दहा हजारांहून अधिक लोक राहतात. या गावाचे जतन आणि विकास करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची ग्वाही मुख्यमंत्री पी. विजयन यांनी विधानसभेत दिली. मुनरोचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्व उपाय करील, असेही ते म्हणाले. आमदार कोवूर कुंजुमोन यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुनरो बेट बुडत चालल्यामुळे तेथील लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढा कोवूर यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला.