शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ; जागतिक बँक-फडणवीस

By admin | Updated: April 26, 2016 01:59 IST

दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडेमुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादरमुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ...


दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडे
मुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादर
मुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडून ५ हजार कोटींचे कर्ज मागितले असून तसा प्रस्तावही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यातील ३ हजार गावे आणि विदर्भातील २ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यास मोठी मदत होईल. तसेच जलसंवर्धनाच्या कामावरही भर देता येईल. त्यानंतर दुष्काळी भागासाठी पीकपद्धत बदलण्याचा निर्णय घेतला जाईल. ही योजना मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जलसंवर्धन ते पीक पद्धतीत बदल करणे, यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जागतिक बँकेने दुष्काळ निवारण निधीतून ५ हजार कोटींचे कर्ज देऊन मदत करावी, अशी जागतिक बँकेला विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ही मदत मागण्यात आल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
जागतिक बँकेच्या दुष्काळ निवारण निधीतून हे कर्ज मिळण्यास साधरणत: दीड वर्षे लागते. परंतु, महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशी विनंती जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांना केली आहे.