शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर मुद्द्यावरुन गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले संसदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:54 IST

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुनसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक झाली. ज्यामध्ये सभागृहाच्या कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीत १७ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चेवर ठाम असून त्यासाठीच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, डीएमके, सीपीआय(एम), आरजेडी, एसपी, एनसीपी, एसएस, आप, सीपीआय, आययूएमएल, आरएलडी, केसी(एम), जेएमएम, जेडी (यू), आरएसपी, व्हीसीके या पक्षांचा समावेश होता.

विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणाशिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "आम्ही काळे कपडे घालून निषेध करण्यासाठी आलो आहोत. आज संसदीय लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान आपले मौन सोडत नाहीत", असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. तर लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या गौरव गोगोई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, देशाचा भाग जळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि पंतप्रधान केवळ भाषणात व्यस्त आहेत.

अविश्वास प्रस्तावावर लवकरच होणार चर्चा दरम्यान, बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला मंजुरी देण्यात आली आहे. सभापती ओम बिर्ला यांनी गौरव गोगोई यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा केव्हा आणि किती काळ होणार याबाबत लवकरच चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सतत चर्चा करण्यास सांगितले. अमित शाह म्हणाले की, "प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी स्वतः देईल". मात्र, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर दिले पाहिजे, या भूमिकेवर विरोधक ठाम होते. यामुळेच मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.  

टॅग्स :ParliamentसंसदManipur Violenceमणिपूर हिंसाचार