शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संसदेसाठी ड्रेसकोड; कमळाचा शर्ट अन् नेहरू जॅकेट, गणेश चतुर्थीला होणार श्रीगणेशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 07:33 IST

New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : नवीन संसदेतसंसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे.

१९ सप्टेंबरला, गणेश चतुर्थीच्या दिवशीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यवाही नवीन संसदेत सुरू करतील, तेव्हा संसदेतील कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांची वेशभूषा बदललेली असेल. नवा ड्रेसकोड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (एनआयएफटी) तयार केला आहे.

नव्या ड्रेसकोडनुसार, संसदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कमळाच्या फुलाचे प्रिंट असलेला गडद गुलाबी रंगाचा शर्ट, खाकी रंगाची पँट व गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागेल. यापूर्वी ते बंद गळ्याच्या गडद  निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होते. महिलाही त्याच रंगाची साडी परिधान करत होत्या.

सुरक्षा कर्मचारी, मार्शलनाही नवा ड्रेस : संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लष्कराप्रमाणे केमोफ्रेज ड्रेस परिधान करावा लागेल. यापूर्वी ते निळ्या रंगाचा सफारी सूट परिधान करत होते, तर मार्शलला आता मणिपुरी पगडी परिधान करावी लागेल. 

१९ सप्टेंबरपासून नव्या संसदेत कामकाज- १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. - पहिल्या दिवशी १८ सप्टेंबर रोजीची बैठक जुन्या संसद भवनात होणार आहे. - १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा-अर्चना केल्यानंतर शुभमुहूर्तावर नवीन संसदेत कामकाज सुरू होणार आहे. 

 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार