शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:34 IST

टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या खासदारांना ते सदस्यता आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्यांनी आतापर्यंत सात वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. वीरेंद्र कुमार हे दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. मध्य प्रदेशातील टिकमगडचे खासदार वीरेंद्र कुमार हे सागर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी सागर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ते टिकमगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मोदींच्या नेतृत्वातील पहिल्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जात नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्ष कामकाज सांभाळतात. हंगामी अध्यक्ष हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला केलं जातं. हंगामी अध्यक्ष सभागृहातील इतर खासदारांना शपथ देतो. नव्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर हंगामी अध्यक्षांचा कार्यभाग संपुष्टात येतो.कोण असतो हंगामी अध्यक्ष ?जो प्रतिनिधी निवडणुकीनंतर पहिल्या सत्रात स्थायी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाची निवड होईपर्यंत लोकसभा किंवा विधानसभेचं काळजीवाहू अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळतो, त्याला हंगामी अध्यक्ष म्हटलं जातं. हंगामी अध्यक्षांचा कार्यकाळ हा फार कमी असतो. सामान्यतः सदनातल्या वरिष्ठ सदस्याला ही जबाबदारी सोपवली जाते. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड होत नाही, तोपर्यंतच हंगामी अध्यक्ष हा कार्यभार सांभाळतो. जेव्हा सदनातील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद रिकामी असेल, तेव्हाच हंगामी अध्यक्षांची गरज लागते. 

टॅग्स :lok sabhaलोकसभा