शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘ओआरएस’चा जनक हरपला, डॉ. दिलीप महालनाबिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 06:10 IST

डॉ. दिलीप महालनाबिस यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

मुंबई : जगातील वैद्यकीय विश्वाला ओआरएसच्या रूपाने (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) संजीवनी देणारे डॉ. दिलीप महालनाबिस यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी कोलकात्याच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या या संशोधनाने जगभरातील असंख्य नागरिक आणि बालकांचे मृत्यू प्रमाण कमी झाले. जुलाब आणि उलट्या झाल्यानंतर मोठया प्रमाणात रुग्णांना अशक्तपणा येतो. शरीरातील पाणी आणि मिठाचे प्रमाण कमी होते, त्या काळात ओआरएस दिल्याने रुग्णाला आराम मिळतो. डॉ. महालनाबिस यांच्या या संजीवनीला जगभरात स्वीकारले गेले आहे. 

डॉ. दिलीप महालनाबिस यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३४ साली झाला. त्यांचे वैद्यकीयचे शिक्षण कोलकाता वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून झाले. लंडन येथे दोन वर्षे नॅशनल हेल्थ सर्व्हिस येथे काम करून व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते कोलकात्याला परतले. त्यानंतर त्यांनी १९६६ साली  ओआरएस या विषयावर संशोधन करण्यास सुरुवात केली.  त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. डेव्हिड आर. नलीन आणि डॉ. रिचर्ड ए. कॅश सोबत होते. 

बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि...१९७१ साली बांगलादेश मुक्तिसंग्रामात लाखो बांगलादेशी नागरिक बंगालात विस्थापित झाले होते. त्यावेळी कॉलरा या साथीच्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. 

मोठ्या प्रमाणात साथ पसरल्यामुळे हाताच्या शिरेतून देणाऱ्या औषधाची कमतरता भासू लागली होती. त्यावेळी डॉ. महालनाबिस यांनी ओआरएस मोठ्या प्रमाणात दिले. त्यामुळे ३० टक्क्यांपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ३ टक्क्यांपर्यंत आले. त्यांच्या या प्रयोगानंतर ओआरएसची संपूर्ण जगात चर्चा झाली. या सोप्या पद्धतीला जगभरात गौरविले गेले. 

पाणी, मीठ, बेकिंग सोडा आणि ग्लुकोज या मिश्रणाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. २००२ मध्ये डॉ. महालनाबिस यांना कॉर्नवेल येथील कोलंबिया विद्यापीठाने प्रतिष्ठित पोलिन बक्षीस देऊन  गौरविण्यात आले. थाई सरकारनेही २००६ साली डॉ. महालनाबिस यांना प्रिन्स माहीडोल अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला होता. 

डॉ. महालनाबिस यांनी ओआरएसच्या रूपाने मोठे वरदान वैद्यकीय व्यस्थेला दिले आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल जगभरातील सर्व प्रतिष्ठित वैद्यकीय संशोधन करणाऱ्या जर्नलमध्ये घेतली होती. या संशोधनाने करोडो नागरिक आणि बालकांचे मृत्यू कमी होण्यास मदत झाली. त्यांचे काम शब्दात मांडणे अवघड आहे. ओआरएस ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. घरी आपण त्याला पर्याय म्हणून योग्य प्रमाणात मीठ, पाणी, साखर यांच्या मिश्रणाचा वापर करतो.- डॉ. सुहास प्रभू, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ