शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

धक्कादायक!; आयएसआय एजंटच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये भारतीय संरक्षण दलातील 50 अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 09:29 IST

हनीट्रॅप करुन संवेदनशील माहिती मिळवल्याचं उघड

हरियाणा: हनीट्रॅपच्या माध्यमातून हेरगिरी करणाऱ्या एका महिला आयएसआय एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये सुरक्षा दलातील जवळपास 50 जणांचा समावेश असल्याची माहिती तपासातून पुढे आल्यानं हरियाणाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. या 50 जणांमध्ये भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलातील अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 'इंडिया टुडे'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहेआयएसआय एजंट अमृता अहलुवालियानं एका 22 वर्षीय भारतीय तरुणाला हनीट्रॅप केलं होतं. गौरव शर्मा असं या तरुणाचं नाव आहे. अमृतानं गौरवकडून भारतीय संरक्षण दलांशी संबंधित अतिशय संवेदनशील माहिती गोळा केली. शर्माला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. अमृताच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये एक लेफ्टनंट जनरल, तीन कर्नल, तीन मेजर, एक कॅप्टन, एक कमांडर, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील एक प्रशिक्षणार्थी आणि जम्मू-काश्मीरमधील एका तुरुंग अधीक्षकाचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कर्तव्य बजावत आहेत. अमृता अहलुवालियाच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये राजकारणी, उद्योजक, शिक्षक आणि हरियाणातील शासकीय अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. मात्र सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं एकाही व्यक्तीचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. अमृतानं तिच्या फेसबुक प्रोफाईलवर ती मूळची चंदिगढची असून सध्या नवी दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती दिली आहे. तिच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये एकूण 145 जण असून त्यातील 15 जणांशी तिची नुकतीच मैत्री झाली आहे. मात्र यातील कितीजणांना हनीट्रॅप करण्यात आलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमृताला गौरव शर्माकडून भारतीय संरक्षण दलाबद्दल अतिशय संवेदनशील माहिती मिळाली आहे. गौरव एका निवृत्त लष्करी जवानाचा मुलगा आहे. गौरव अमृतासाठी हेर म्हणून काम करत होता. भारतीय लष्कराकडून घेण्यात आलेल्या 18 भरती प्रक्रियांच्यावेळी हेरगिरी केल्याची कबुली गौरवनं दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानं चारवेळा भरती प्रक्रिया सुरु करताना फेसबुक लाईव्ह केलं. पाकिस्तानातील आयएसआयच्या हँडलर्ससाठी त्यानं हे लाईव्ह केलं होतं. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचं आमिष देण्यात आलं होतं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान