शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त लष्करी अधिका-याच्या नागरिकत्वावर शंका, १९७१ मध्ये भारतात प्रवेश केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:28 IST

संरक्षण दलातून निवृत्त झालेले ज्युनियर कमिशन्ड आॅफिसर मोहम्मद अझमल हक यांनी मला विदेशी लवादाकडून आलेल्या नोटिशीत मी बेकायदा बांगलादेशी स्थलांतरित असून

गुवाहाटी : संरक्षण दलातून निवृत्त झालेले ज्युनियर कमिशन्ड आॅफिसर मोहम्मद अझमल हक यांनी मला विदेशी लवादाकडून आलेल्या नोटिशीत मी बेकायदा बांगलादेशी स्थलांतरित असून, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यास सांगितल्याचा दावा केला आहे.आसाममध्ये वास्तव्यास असलेले हक ३० सप्टेंबर, २०१६ रोजी निवृत्त झाले. ते शनिवारी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, ‘मला मिळालेल्या नोटिशीमुळे संशयास्पद मतदारांच्या यादीत मला ठेवले गेले आहे. योग्य दस्तावेजाशिवाय १९७१ मध्ये भारतात प्रवेश केल्याचा आरोपही माझ्यावर ठेवला गेला आहे.’‘मी भारतीय लष्करात ३० वर्षे सेवा केली. मला माझे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी १३ आॅक्टोबर रोजी स्थानिक लवादापुढे संबंधित दस्तावेजासह हजर राहण्यास या नोटिशीद्वारे सांगण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी मला लवादापुढे हजर राहण्यास सांगितले गेले होते, परंतु ती नोटीस मला त्याच तारखेनंतर मिळाली,’ असे हक म्हणाले. मी १३ आॅक्टोबरला हजर राहणार आहे. हक म्हणाले की, ‘मी संशयास्पद मतदारांच्या यादीत असल्याबद्दल मला २०१२ मध्येदेखील नोटीस मिळाली होती, परंतु मी लवाद न्यायालयापुढे सगळी कागदपत्रे सादर केल्यानंतर लवादाने मला भारतीय नागरिक असल्याचे जाहीर केले होते. अनेक वेळा मला का अपमानित केले जात आहे? माझी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की, एका नागरिकाचा हा छळ थांबवा. अशी नोटीस आलेला मी काही माझ्या कुटुंबात पहिलाच नाही, तर २०१२ मध्ये माझी पत्नी ममताज बेगम हिलादेखील लवाद न्यायालयाने तिचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यास बोलावले होते.’हा विषय वकील अमन वदूद यांनी लष्कराच्या निदर्शनास टिष्ट्वटरद्वारे आणून दिला आहे. त्यावर मेजर डी. पी. सिंग यांनी हक यांना आवश्यक ते साह्य केले जाईल, असे सांगितले.