शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसांत मोदी सरकारसाठी दुहेरी आनंदाची बातमी; शेअर बाजारावर होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:34 IST

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना एका दिवसात दुहेरी आनंद मिळाला आहे.

नवी दिल्ली - देशात महागाईनं दिर्घकाळ उच्चांक गाठलेला असताना ती रोखण्याची सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत होतं. पण ऑक्टोबरमध्ये आलेल्या महागाई दराच्या आकडेवारीने देशवासीयांसह केंद्रातील मोदी सरकारसाठी दुहेरी आनंदाची बातमी आणली आहे. देशातील घाऊक महागाई २.३१ टक्क्यांनी घटली, सोमवारी सकाळी पहिली चांगली बातमी आली त्यानंतर, संध्याकाळी दुसरी चांगली बातमी आली, जेव्हा किरकोळ महागाईचा दरही दीर्घ कालावधीनंतर ७ टक्क्यांच्या खाली आला आहे. 

किरकोळ महागाई ७ टक्क्यांच्या खाली देशातील किरकोळ महागाई दर सलग आठ महिने रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त राहिला, सर्व प्रयत्नांनंतरही ते ७ टक्क्यांच्या खाली आणणे शक्य झाले नाही. यासाठी सरकार आणि आरबीआय सातत्याने प्रयत्न करत होते. आता त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. ऑक्टोबरच्या आकडेवारीनं दिलासादायक बातमी आली आणि बऱ्याच काळानंतर CPI (Retail Inflation) अखेर ७ टक्क्यांच्या खाली आली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६.७७ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा आकडा ७.४१ टक्के होता.

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना एका दिवसात दुहेरी आनंद मिळाला आहे. ऑक्टोबरमधील किरकोळ महागाईचा हा आकडा दिलासा देणारा असला तरी तो अजूनही आरबीआयने ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ७.०१ टक्क्यांवर आला आहे.

घाऊक महागाईत मोठी घसरणसोमवारी सकाळी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ऑक्टोबर महिन्याची घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली होती. घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमध्ये १०.७० टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये ८.३९ टक्क्यांवर घसरला. प्रदीर्घ काळानंतर घाऊक महागाईचा दर दुहेरीवरून एक अंकावर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर मार्च २०२१ नंतर प्रथमच दुहेरी अंकांच्या खाली आला आहे. घाऊक महागाई सलग १८ महिने दुहेरी अंकात होती.

शेअर बाजारावर होणार परिणाम ऑक्टोबरमध्ये देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाई दरातून दिलासा मिळाल्याचा परिणाम मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येण्याची शक्यता आहे. महागाई कमी झाल्याच्या बातम्यांमुळे शेअर बाजारात तेजी दिसण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Inflationमहागाई