शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रानं दिली स्थगिती; केजरीवाल म्हणाले, "आम्ही रेशन योजनेचं नाव बदलायला तयार, क्रेडिटही नको"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 17:07 IST

Arvind Kejriwal : केंद्राच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी योजनेवरून नाव हटवण्याच्या केल्या सूचना

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात या योजनेची केली होती घोषणाकेंद्रानं पत्र लिहून दिल्ली सरकारला योजना सुरू न करण्याचे दिले होते निर्देश

केंद्रातील मोदी सरकारनंदिल्लीतीलअरविंद केजरीवालसरकारला मोठा झटका दिला होता. दिल्ली आम आदमी सरकारकडून 'मुख्यमंत्री - प्रत्येक घरात रेशन' ही योजना सुरू करण्यात येणार होती. येत्या २५ मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती. परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली. केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून ही योजना सुरू न करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, यानंतर अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका समीक्षा बैठकीचं आयोजन केलं होतं. तसंच ही योजना कशा प्रकारे सुरू करता येईल यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान त्यांनी या योजनेवरून नावदेखील हटवण्याचा पर्याय सूचवला.

केंद्र सरकारनं दिल्लीत २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या रेशनच्या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर स्थगिती आणली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत केंद्र सरकार राज्यांना रेशन देत असतं. यामुळे यात कोणताही बदल करता येणार नसल्याचं केंद्रानं म्हटलं म्हटलं होतं. यानंतर केजरीवाल यांनी बैठक घेतल्यानंतर याबाबत माहिती दिली. "दिल्ली सरकारनं अनेकांशी चर्चा केल्यानंतर यावर मार्ग काढला होता. जेवढा गहू लोकांना देण्यात येतो तितकंच पीठ आणि जेवढा तांदूळ दिला जातो तो पिशवीतून लोकांच्या घरी पोहोचवण्याचा पर्याय समोर आला होता. यामुळे लोकांच्या समस्याही कमी होतील असा दावा दिल्ली सरकारनं केला होता. हाच विचार करून मुख्यमंत्री प्रत्येक घरात रेशन योजना सुरू करण्यात येणार होती. परंतु शुक्रवारी सरकारकडून आम्हाला एक पत्र आलं. यात तुम्ही ही योजना लागू करु शकत नसल्याचं म्हटलं होतं. ही योजना २५ मार्चपासून सुरू होणार होती. परंतु हे ऐकून आम्हाला धक्का बसला," असं केजरीवाल म्हणाले.योजनेवरून नाव हटवण्याच्या सूचना"आज सकाली मी अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली. तसंच या योजनेवरून नाव हचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या योजनेचं कोणतंही नाव नसेल. जे रेशन येत होतं ते पहिले दुकांनांच्या द्वारे दिलं जात होतं. आता आम्ही ते थेट घराघरात पोहोचवू. आम्हाला कोणाचंही नाव किंवा क्रेडिट घेण्यात पडायचं नाही. या निर्णयानंतर मला असं वाटतं की केंद्र सरकारला ज्या समस्या होत्या त्या दूर होती आणि ही योजना सुरू करण्याची आम्हाला मंजुरी मिळेल," असं केजरीवाल म्हणाले. गेल्या आठवड्यात केली होती घोषणा

केजरीवाल सरकारनं गेल्याच आठवड्यात २५ मार्चपासून रेशनची डोअर स्टेप डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीमापुरी सर्कल भागातील १०० घरांमधअये रेशन पोहोचवण्यासोबतच मुख्यमंत्री प्रत्येक घरात योजनेचा २५ मार्च रोजी शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता. अन्य क्षेत्रांमध्ये ही योजना १ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार होती. ही योजना सुरू केल्यानंतर दिल्लीत रेशनमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी रेशन माफियांचा अंत करण्यासाठी मदत मिळणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारनं केला होता. ही योजना यापूर्वीच सुरू करण्यात येणार होती. परंतु बायोमॅट्रिक मशीन लावण्याचं काम पूर्ण न झाल्यानं ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGovernmentसरकारdelhiदिल्लीfoodअन्न