शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे बंद; प्रवेशासाठी नवीन कार्ड देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:04 IST

माजी खासदार हे विद्यमान खासदाराचे अतिथी म्हणून जाऊ शकतात, माजी खासदारांना आजही जुन्या संसद भवनात, ग्रंथालयात आणि संसद भवन ॲनेक्सीत प्रवेश करण्याची सुविधा आहे, मात्र माजी खासदारांना नव्या संसदेत प्रवेश करता येत नाही.

संजय शर्मानवी दिल्ली : नव्या संसदेच्या नव्या नियमांमुळे सध्याचे आणि माजी खासदार सगळेच त्रस्त असून माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे अजूनही उघडलेले नाहीत.  विद्यमान खासदार असो किंवा माजी खासदार; या सर्वांनाच नवीन संसदेच्या नव्या इमारतीत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यमान खासदारांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे नियम करण्यात आले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत प्रवेशासाठी स्वतंत्र दरवाजे निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजेच, खासदारांसाठीही संसदेत प्रवेशाचे नियम करण्यात आले आहेत. माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे अद्याप उघडलेले नाहीत. 

माजी खासदारांना आजही जुन्या संसद भवनात, ग्रंथालयात आणि संसद भवन ॲनेक्सीत प्रवेश करण्याची सुविधा आहे, मात्र माजी खासदारांना नव्या संसदेत प्रवेश करता येत नाही. माजी खासदारांना नवीन संसदेत जायचे असेल तर ते विद्यमान खासदारांचे अतिथी म्हणून जाऊ शकतात; तर जुन्या संसदेत कोणतेही खासदार वर्तमान किंवा माजी, हे कधीही जाऊ शकत होते. कोणताही खासदार, मग तो लोकसभा किंवा राज्यसभेचा असो; कोणत्याही गेटमधून जाऊ आणि येऊ शकत होता. 

माध्यमांसाठी एकच गेटपूर्वी प्रसारमाध्यमांना कोणत्याही गेटमधून आत जाता येत असे; पण आता माध्यमांना एकाच गेटमधून जावे आणि यावे लागेल. 

संसदीय कर्मचारीही त्रस्तनव्या संसदेच्या नियमांमुळे अगदी संसदीय कर्मचारीही त्रस्त आहेत. नव्या संसदेत राजकीय पक्षांना अद्याप कार्यालये देण्यात आलेली नाहीत. याचे कारण जागेचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे. आताही जुन्या संसद भवनात राजकीय पक्षांची कार्यालये सुरू आहेत. 

माजी खासदारांना प्रवेशासाठी नवीन कार्ड देणार २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेचे लोकार्पण केले. तेव्हापासून नवीन संसदेत नवीन नियम लागू करण्यात आले. माजी खासदारांनाही नव्या संसदेत प्रवेश मिळावा यासाठी लवकरच नियम बनवले जातील, असे संसदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. माजी खासदारांना प्रवेशासाठी नवीन कार्ड दिले जातील.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी