शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

डोळा लागला, फिकर नॉट! कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; कोर्टानेच सांगितलेय... पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:43 IST

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या करारानुसार कामाचे तास आठवड्यातून ४८ तास व दिवसाचे ८ तासांपेक्षा जास्त नसावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

बंगळुरू : कर्नाटकातील एक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले होते. याविरोधात कर्मचाऱ्याने हायकोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा, आराम करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

या कर्मचाऱ्याला ६० दिवस विश्रांतीशिवाय दररोज डबल शिफ्ट (१६ तास) काम करण्यास भाग पाडले गेले, असे आढळून आले होते. त्यामुळे झोपण्याच्या अधिकाराचे महत्त्व व शिफ्टमध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या जीवन संतुलनावर न्यायालयाने यावेळी जोर दिला व कॉन्स्टेबलला दोषी ठरविले नाही.

कर्मचाऱ्यांवर कामाचा भारयाचिकाकर्त्याच्या निलंबनाची शिफारस करणाऱ्या महामंडळाच्या दक्षता विभागानेही आगारात केवळ तीन हवालदार असून, सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार खूप जास्त असल्याचा अहवाल सादर केला होता.यात आगाराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आणखी दोन हवालदारांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. 

दिवसाचे १६ तास काम करण्यास भाग पाडलेकल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (केकेआरटीसी) कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांना १ जुलै २०२४ रोजी ड्यूटीवर असताना झोपल्यामुळे निलंबित करण्यात आले होते.केकेआरटीसीने निलंबनाच्या आदेशाचे समर्थन केले असले तरी महामंडळाने चंद्रशेखर यांना हवालदार कर्मचारी कमी असल्याने ६० दिवस विश्रांतीशिवाय दिवसाचे १६ तास काम करण्यास भाग पाडले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

कामाचे तास ८ तासांपेक्षा जास्त नसावेतजर याचिकाकर्त्याची ड्यूटी एका शिफ्टपुरती मर्यादित असेल आणि तो ड्यूटीवर असताना झोपला तर ती निःसंशयपणे गैरवर्तणूक होईल.परंतु खटल्यातील जी काही तथ्ये आहेत, त्यानुसार याचिकाकर्ता कर्तव्याच्या वेळेत झोपल्याने दोषी आढळला नाही.आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या करारानुसार कामाचे तास आठवड्यातून ४८ तास व दिवसाचे ८ तासांपेक्षा जास्त नसावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :jobनोकरीCourtन्यायालय