शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:07 IST

काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून सरकारने जीडीपीचा खोटा आकडा दाखवला.

पणजी: इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिन्सवर (इव्हीएम)भरवसा ठेऊ नका, लोकांचे मत वेगळे आणि मशिन्सचे मत वेगळे होण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा माजी केंद्रीय अथर्मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे. दोनापावला येथील इंटरनेशनल सेंटरमध्ये बोलताना त्यांनी देशात अघोषित आणिबाणी लागू  करण्यात आल्याचे सांगितले. सिटिझन्स फॉर डेमॉक्रोसी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर कडक टीका केली. इव्हीएमवर भरवसा ठेवणे कठीण असून इव्हीएमचे मत आणि लोकांचे मत हे सारखे असेलच हे सांगता येत नाही. काही ठिकाणी घेण्यात आलेल्या चाचणीत ९ इव्हीएमद्वारे करण्यात आलेल्या मतदानात १० पैकी ८ मते ही भाजपच्या बाजूने झाली होती असे त्यांनी सांगितले. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा आपला आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवसात कपात करण्याचे काम या सरकारने केले असून हा प्रकार दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी  तीन दिवस सामान्य अर्थसंकल्पावर तर ३ दिवस रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा केली जात होती. आता दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केल्यानंतर दोन्ही अर्थसंकल्पांना मिळून दीड दिवसच दिला जातो. त्यातही चर्चा होवू दिली जात नाही. अण्णाद्रमुक पक्षाचे खासदार सभागृहात गोंधळ घालतात आणि कामकाज स्थगित ठेवले जाते. अण्णाद्रमुक हा भाजपाशी जवळीक असलेला पक्ष असून हे हेतूपुरस्सर सरकारपक्षाकडूनच केले जाते असा आरोपही त्यांनी केला. देशाचा आर्थिक विकास हा खुंटला गेला आहे. सरकारकडून चुकीचे आकडे दाखविले जात आहेत. २०१४ साली दाखविण्यात आलेला ४.५ हा विकास दर चुकीचा असून तो ६.५ एवढा होता. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून तो चुकीच्या पद्धतीने चुकीचा दर दाखविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परीषद घेऊनही देशातील लोक सावध होत नसेल तर ते दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्री नव्हे लोकांचा संत्री: शत्रुघ्नआपल्याच पक्षाच्या विरोधात रणशिंग फुंकलेले भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंत्री नव्हे आपण जनतेसमोर खरे ते बोलू नये म्हणून आपल्याला मंत्रीपदाची लालच दाखविली जात असल्याचे सांगितले. परंतु आपण मंत्री बनण्यापेक्षा जनतेचा संत्री होणे पसंत करेन, असे त्यांनी सांगितले. देशात अत्यंत वाईट परिस्थिती असून दलित, अल्पसंख्याक, शेतकरी व कामगार वर्ग दहशतीच्या छायेत असल्याचेही त्यांनी सांगितले.    

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाElectionनिवडणूक