नवी दिल्ली - अमेरिकेने उच्च कौशल्य असलेल्या कामगारांसाठी एच-१बी व्हिसावर दरवर्षी ८८ लाख रुपयांचे शुल्क आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून होणारे दिखाऊ राजकारण व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बाळगण्यात येणारे मौन या गोष्टी भारताच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण करत आहेत. हे केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
राहुल गांधी यांनी सांगितले की, एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण म्हणजे ‘केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसाला दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. त्याबदल्यात ट्रम्प यांनी भारताला दिलेले रिटर्न गिफ्ट म्हणजे एच-१ बी व्हिसाबाबत त्यांनी घेतलेला निर्णय होय.
ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’!एच-१बी व्हिसाकरिता दरवर्षासाठी आकारले ८८ लाख रुपयांचे शुल्कया व्हिसाधारकांत ७२ टक्के भारतीय, त्यांना बसणार मोठा फटकाभारतावर लादले ५० टक्के आयात शुल्कहायर ॲक्टमध्ये भारतीय आऊटसोर्सिंगवर अमेरिकेचा थेट हल्लाचाबहार बंदरावरील सूट काढण्यात आली.भारत-पाक युद्ध थांबविल्याचा ट्रम्प यांचा वारंवार दावायुरोपियन युनियनकडून भारतीय वस्तूंवर १०० टक्के कर लावण्याची मागणी.