शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump's India Visit : अन् साबरमती आश्रमात मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले सूतकताईचे धडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:06 IST

Donald Trump's India Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली.

अहमदाबाद -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात अहमदाबाद येथे आगमन झाले आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली. 

साबरमती आश्रमामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांचे सूती शाल घालून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदींनी आश्रमाची माहिती दिली. यावेळी मोदींनी ट्रम्प यांना चरख्याबाबत माहिती दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी चरख्यावर सूतकताई कशी करतात हे जाणून घेत स्वत: चरखा चालवला. 

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले. 

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात  अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल.  डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIndiaभारतahmedabadअहमदाबादMahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी