शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 09:05 IST

डोनाल्ड ट्रम्प राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेतील काही राजकीय कार्यक्रम आणि संसदेतील भाषणामुळे ट्रम्प प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी शक्यता आहे. तसे संकेत अमेरिकेकडून मोदी सरकारला देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं आमंत्रण मोदी सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलं आहे. मात्र अमेरिकेच्या संसदेत भाषण करायचं असल्यानं ट्रम्प नोव्हेंबरपासून अतिशय व्यस्त असणार आहेत. या भाषणातून ट्रम्प पुढील वर्षासाठी आखण्यात आलेला अजेंडा संसदेसमोर ठेवतील. याशिवाय सरकारच्या कामगिरीचीदेखील माहिती देतील. त्यामुळे ट्रम्प यांचं भाषण पुढील राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. मात्र 2015 मध्ये संसदेत भाषण द्यायचं असूनही तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. जानेवारीत ट्रम्प यांचे काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत. मात्र याआधी मोदी आणि ट्रम्प अर्जेंटिनातील जी-20 परिषदेत भेटतील. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयरिसमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण अमेरिकेत होणारी ही पहिलीच जी-20 परिषद असेल. या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात होणारी चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं होतं. 2016 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर 2017 मध्ये अबूधाबीचे राजे सोहळ्याला उपस्थित होते.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी