शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले

By जयदीप दाभोळकर | Updated: January 8, 2021 13:45 IST

जे आजवर जगात कुठेही घडलं नाही ते ट्रम्प अमेरिकेत करत असल्याची आठवलेंची टीका

ठळक मुद्देट्रम्प यांनी पराभव स्वीकारून नव्यानं प्रयत्न करणं आवश्यक होतं, आठवले यांचं मतगुरूवारी अमेरिकेच्या संसद परिसरात ट्रम्प समर्थकांनी घडवला होता हिंसाचार

"अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा,  लोकशाहीचा अवमान केला आहे. लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणं आवश्यक होतं. ट्रम्प यांनी मात्र या उलट कृती करून स्वत:ची प्रतीमा मलिन करून घेतली आहे," अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांना स्वत:ला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नसल्याचंही ते म्हणाले.

"अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आम्हाला आदर होता मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदावर राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतीमेला काळिमा फासणारी आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या विजयला संमती देण्यात आडकाठी आणायचे हिन कृत्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे," असे आठवले म्हणाले.जे आजवर घडलं नाही ते ट्रम्प करतायत"अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून ट्रम्प यांनी नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते," असेही त्यांनी नमूद केले."पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर करून ट्रम्प यांनी  रिपब्लिकनचा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे. भारतात ग्राम पंचायतीपासून संसदेपर्यंत लोकशाहीच्या न्यायानुसर बहुमताचा, जनमताचा सन्मान केला जातो. मात्र जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतर होताना ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला," नाही अशी टीकाही आठवले यांनी केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पRamdas Athawaleरामदास आठवलेAmericaअमेरिकाIndiaभारत